शुभम वाकचौरे
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १७ रोजी रात्री 10/00 वा.फिर्यादी व त्यांचे कंपनीतील तुषार संकपाळ हा सिक्युरीटी त्याचे मोटारसायकलवर मौजे करडे ता. शिरूर जि. पुणे गावचे हद्दीत ते राहत असलेल्या (रूमवर) सोडवण्यास आला व तो रूमशेजारी सोडुन माघारी गेला. फिर्यादी रूममध्ये जात असताना एक ग्रे. कलरची स्वीप्ट कार नं. एम. एच. 14-एफ. जी. 0078 ही फिर्यादीचे समोर येऊन थांबली. त्यातून अमोल विलास देशमुख, प्रणव राजेंद्र जगदाळे व अमोल नितीन देवरे रा. करडे असे गाडीतून उतरले व मोटारसायकलवर एक जण अनोळखी इसम आला त्यातील अमोल देशमुख हा फिर्यादीला म्हणाला की, तु माझा ट्रॅक्टर व हायवा गाडी का कंपनीला लावली नाही असे म्हणुन हाताने फिर्यादीचे तोंडावर मारले त्यावेळी त्याचेसोबत आलेले प्रणव जगदाळे व अमोल देवरे यांनी गाडीतून हाँकी स्टीक व लाकडी काठी काढली त्यातील एक काठी अमोल – देशमुख यास दिली व त्या काठीने व हॉकी स्टीकने त्यांनी फिर्यादीला मारणेस सुरूवात केली त्यांनी फिर्यादीस पाठीवर व पायावर लाकडी काठीने व हाँकी स्टीकने मारहाण केली. मोटारायकल वर आलेल्या अनोळखी माणसाने फिर्यादीस पाठीमागुन धरले होते. ते मारहाण करत असताना फिर्यादी मोठ्याने ओरडले असता त्यावेळी फिर्यादीची पत्नी श्रधांजली ही खाली आली व मोठ्याने ओरडली त्यावेळी ते सर्वजण निघून गेले फिर्यादीस मारहान झाल्याने त्यांनी 112 ला फोन केला. तेथे पोलीस आले व उपचाराकरीता न्हावरा ग्रामीण रूग्णालय येथे घेवुन गेले तेथील डॉक्टरांनी फिर्यादीवर प्राथमीक उपचार करून ससुन येथे रेफर केले. परंतु ते ससुन हॉस्पिटल येथे न जाता श्री गणेशा हॉस्पिटल शिरूर येथे अँडमिट झाले आहे. मारहान करणारे इसम नामे 1) अमोल विलास देशमुख 2) प्रणव राजेंद्र जगदाळे 3) अमोल नितीन देवरे इतर अनोळखी 1 इसम असे सर्व राहणार करडे यांनी लाकडी काठीने व हाँकी स्टीकने मारहाण केली असल्याने त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके हे करत आहे.