▪️प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषा प्रभावी असून शालेय स्तरापासून त्याची रूजवणूक होणे अत्यावश्यक असल्याचे मत प्राचार्या अश्विनी घारू यांनी १४ सप्टेंबर हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आर एम धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल घोडनदी शिरूर येथे केले.आपल्या भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणून हिंदी भाषेकडे पाहणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हिंदीमध्ये प्रचंड साहित्य उपलब्ध असून ते शिक्षणाच्या आधुनिक माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी विद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख रेखा कदम आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की हिंदी यह हमारी राष्ट्रभाषा है इसलिए हर दिन दप्तर,और घर में हिंदी भाषा मे बातचीत करके हिंदी का सम्मान बढांना चाहिए!हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यालयात सुंदर हस्ताक्षर,काव्यवाचन,नाटक,भाषण, निबंध,दोहे यांसह अनेक स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थांनी वेगवेगळ्या फलकांच्या साहाय्याने हिंदी दिनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षका अपर्णा वळसे, राजेश्वरी नायर,तृप्ती आगळे,स्नेहल शर्मा,सायली पटवर्धन,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य नंदकुमार निकम,शालेय समितीचे चेअरमन शिरीष बरमेचा, सदस्य धरमचंदजी फुलफगर,राजेंद्र भटवेरा,शिरीषजी गादीया यांनी उत्कृष्ट नियोजनबद्दल सर्वांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गुंजाळ यांनी तर आभार रविंद्र कुरूंदळे यांनी मानले.