▪️निर्वी प्रतिनिधी – शकील मनियार
अजित दादा इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ बारामती या ठिकाणी ऑल इंडिया स्पोर्ट फेडरेशन महाराष्ट्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर,आणि बारामती असे अनेक तालुका व जिल्ह्यामधून 300 ते 350 मुले -मुली या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत भाग घेतला होता.
या राज्यस्तरीय कराटे स्पर्ध्येसाठी आलेलें संघ यावेळी सात संघांमध्ये चुरशीच्या लढाईत इंडियन तायक्वांदो किक बॉक्सिंग शिरूर या संघाने धुवाधार असा खेळ दाखवून प्रथम क्रमांकाचा चषक खेचून आणला. याचबरोबर शिरूर मध्ये नुकत्याच झालेल्या महिला दहीहंडीमध्ये इंडियन तायक्वांदो किक बॉक्सिंग या संघाने प्रथम क्रमांकाची दहीहंडी फोडून 21000 हजार रुपये बक्षीस जिंकून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकवली.शिरूर शहर तसेच परिसरामध्ये या क्लासचे कौतुक होत आहे.याचबरोबर असे अनेक ठिकाणी या संघाने स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिके मिळवलेली आहे.त्यामध्ये नेपाळ, कोलकत्ता, पंजाब, मध्य प्रदेश,मुंबई, गोवा, काश्मीर , कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नासिक, अहमदनगर ,महाबळेश्वर , ठाणे, वाशी असे अनेक ठिकाणी या संघाने विजय मिळवलेला आहे शिरूर पंचक्रोशीत नाही तर गावा गावात या कराटे क्लास च्या नावाची व मुलांची सर्वत्र चर्चा होताना सध्या पाहण्यास मिळत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शिरूर शहरात नाहीं तर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले प्रसिध्द प्रशिक्षक ग्रेंडमास्टर अकबर शेख सर आणि प्रशिक्षक फैजान शेख सर या दोन्ही शिक्षकांचे मुलांना मौलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभलें आहे. विजयी विद्यार्थी *ll गोल्ड मेडल ll*बुशरा मनियार, सुप्रिया गाडीलकर, खुशी बाळे, समृद्धी महामुनी ,मृणाल भोस ,शिवानी बागुल, रुत्वा जावळे , वैदेही झावरे,स्वरांजली महाजन, आर्या चव्हाण, आर्या जाधव, राजलक्ष्मी बोरकर नव्या धनगर ,संस्कृती काकडे शिवन्या कर्डिले, सृष्टी जगताप, तनाज शेख, स्वरा येवले, श्लोक रासकर, श्रेयस लबडे, हर्षवर्धन तुबाकी,अनय कर्डिले, अर्णव हुलगुंडे , विराज पराड,आयुष शिंदे, विकी जाधव, रोहन जाधव, आदित्य गव्हाणे, अर्जुन कुलकर्णी, ऐलन पायस.🥈 सिल्वर मेडल 🥈गौरी काळे, स्नेहा येवले, स्नेहा गाडीलकर ,रुद्रणी झावरे, श्रावणी जाधव, वेदिका सपकाळ, रिजूल शिंदे..**स्वराज शितोळे, कल्पक ईसवे, समर्थ गाडीलकर, सतेज भुजबळ, फरहान सय्यद, जयराम पवार, शिवांश रसाळ, आर्यन सिनलकर* स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व टीमचे संस्थेचे आयोजक आशिष डोईफोडे सरांनी मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस सर्व मुला-मुलींना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.