जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
(समर्थ शैक्षणिक संकुलातील शिक्षण हे बहुआयामी: माजी विद्यार्थी नवनाथ पोकळे)
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच अभियंता दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नवनाथ पोकळे,प्रसाद कसाळ व लक्ष्मण दौंड हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजीव सावंत म्हणाले की,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करताना सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीतून आत्मनिर्भर व्हावे .प्रा.सावंत यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर ठेवला.त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग व त्यात त्यांनी वापरलेली कुशाग्र बुद्धिमत्ता व अभियांत्रिकी चे ज्ञान याचे विश्लेषण केले.
अभियंत्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक कौश्यल्ये हस्तगत करावीत.आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग समाजातील तंत्रज्ञानाशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी करावा.त्यातून ग्रामीण भागात शेती व इतर व्यवसायांसाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित करावे.लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा व जीवनात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन प्रा.राजीव सावंत यांनी केले.विद्यार्थ्यांना अभियंता दिनाविषयी शुभेच्छा देताना माजी विद्यार्थी नवनाथ पोकळे म्हणाले कि,आज खर तर अभियंता दिना निमित्त जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स मध्ये माजी विध्यार्थी म्हणून मला व माझे सहकारी मित्र लक्ष्मण दौंड आणि प्रसाद कसाळ यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले हे खरं तर आमच्या सर्वांचं भाग्य आहे.ज्या कॉलेज मधे आपण शिकलो,आपल्या जीवनाला दिशा मिळाली त्या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून जाण्याचा आंनद काही वेगळाच असतो.
या संकुलातील इंजिनिअरिंग कॉलेज,पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये केवळ पदवी व पदविका मिळवणारा विद्यार्थी निर्माण केला जात नाही तर तो उत्तम व उत्कृष्ठ अभियंता कसा होईल यासाठी प्रयत्न केला जातो.त्यासाठी संस्थेने नामवंत कंपन्यांच्या सहयोगाने विविध कौशल्य केंद्र या ठिकाणी उभारली आहेत.त्याचा मोठा फायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे.त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेच्या काळात ग्रामीण पार्श्वभूमी असलेली मुले जगाच्या स्पर्धेत कुठेही कमी पडणार नाहीत याचीही तयारी करून घेतली जाते.उदयोग व्यवसायाचेही मार्गदर्शन केले जाते.त्यासाठी नामवंत उद्योजकांशी सवांद घडवून आणला जातो.त्याची प्रेरणा व मार्गदर्शन पुढे आम्हाला आमच्या व्यावसायिक जीवनात झाले.जवळपास ५०० पेक्षा अधिक शिक्षक कर्मचारी आणि हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व नवउद्योजक तरुण घडवण्यासाठी या शैक्षणिक संकुलातील शिक्षण हे बहूआयामी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा आणि प्रश्नमंजूषेचे देखील आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके ,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ धनंजय उपासनी,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,एम बी ए चे प्राचार्य डॉ.शिरीष गवळी,समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.कवडे,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,तांत्रिक संचालक डॉ.चंद्रशेखर घुले,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश पाडेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर व प्रा.संजय कंधारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.