अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात उभारला गांडूळ खत प्रकल्प.
जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर
ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय,ओतूर,ता-जुन्नर, जि-पुणे व ग्लोबल ऍग्रो व्हिजन,सावरगाव, ता- जुन्नर, जि-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गांडूळ- खत प्रकल्प तयार करण्यात आला.त्याप्रसंगी योगेश मनसुख मार्गदर्शन करताना म्हणाले,”सद्यस्थितीत शेतीसाठी रासायनिक खतांचा व औषधांचा होणारा प्रचंड वापर हा मानवी जीवनाला अत्यंत हानिकारक आहे,त्यामुळे मानवाचा भविष्यकाळ अत्यंत चिंता- जनक आहे. परंतु नैसर्गिक शेतीने मानवी जीवन समृद्ध होऊ शकते, मानवाला चांगल्या आहाराची गरज आहे.माणसाला विषमुक्त भाजीपाला व अन्नधान्य मिळाल्यास मानवी जीवन समृध्द होईल. त्यातूनच भविष्यकाळ उज्वल असेल.साहजिकच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. भविष्यात माणसाला सेंद्रिय शेतीच तारणार आहे.” “. महाविद्यालयातील विद्यार्थी हा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे या प्रोजेक्टचाफायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल”असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे म्हणाले.
याप्रसंगी महावि- द्यालय आणि ग्लोबल ऍग्रो व्हिजन यांच्यात पाच वर्षासाठी सामंजस्य करार करण्यात आला.याशिवाय विद्यार्थ्यांना गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती कशी करावी याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.ग्लोबल ऍग्रो व्हिजनच्या संचालिका मनीषा गाढवे-मनसुख आणि योगेश मनसुख यांनी विद्यार्थ्यांना गांडूळ खत निर्मिती तसेच झाडपाला,पालापाचोळा,कचरा व्यवस्थापन व त्यातून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी या विषयावर प्रात्यक्षिक व कार्यशाळा यामधून माहिती दिली.
सदर प्रशिक्षणात महाविद्यालयातील पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून प्रकल्पाचे अत्यंत चांगले व्यवस्थापन करून महाविद्यालय परिसरातील सर्व झाडे आणि बगीचा विकसित करण्याचा मानस यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.सदर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले.आभार डॉ.नंद- किशोर उगले यांनी मानले.सदर प्रशिक्षणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विठ्ठल शिंदे,प्रकल्पाचे समन्वयक डॉ.हरी बोराटे, डॉ.व्ही.डी. जाधव, प्रा.सागर पारधी,डॉ.अजय कवाडे, डॉ.निलेश हांडे, डॉ.छाया तांबे, डॉ.संदीपान गव्हाळे, डॉ.संतोष वाळके यांनी संयोजन करून सहभाग घेतला.गणेश डुंबरे,सुरेश थोरात,नितीन गरुड, नवनाथ पारधी यांनी सहकार्य केले.