प्रतिनिधी : मारुती पळसकर
टाकळी हाजी (ता.शिरूर ) येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १६ वर्षावरील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पी एम स्किल रनमध्ये मोठा सहभाग घेतला.जवळपास ३४२ विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. सकाळी साडेआठ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व टाकळी हाजीचे माजी उपसरपंच अजित गावडे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.या स्पर्धेसाठी पुरुष गट आणि महिला गट असे दोन गट तयार करण्यात आले.प्रत्येक गटामध्ये तीन पारितोषिके देण्यात आली.अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी १००१,७०१,५०१ रुपये व उत्तेजनार्थ ५०१ रुपये प्रमाणे पारितोषिके अजितदादा गावडे युवा मंचच्या वतीने देण्यात आली.यामध्ये पुरुष गटात प्रथम अजित अनंत गुद्दे,व्दितीय पवन गीताराम गावडे,तृतीय सचिन कैलास गावडे त्याचप्रमाणे महिला गटात प्रथम मुजावर मुस्कान अंबीर ,द्वितीय कु.काळे अंजली भालचंद्र,तृतीय कु.हवालदार तमन्ना पिरमोहम्मद व उत्तेजनार्थ पारितोषक कु.साबळे प्रियांका सोमनाथ यांना मिळाले.विशेष म्हणजे कु.साबळे प्रियंका ही विद्यार्थीनी यापूर्वी फ्रान्स मध्ये झालेल्या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेली होती.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,टाकळी हाजीचे माजी उपसरपंच अजित गावडे व तुकाराम उचाळे,डोंगरगण सोसायटीचे चेअरमन प्रशांत चोरे,पै.स्वप्निल गावडे,सनी गावडे ,सौरव रासकर,संस्कार मुंजाळ ,ज्ञानेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण स्पर्धेचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. सर्वात शेवटी झालेल्या सभेत विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पै.तुकाराम उचाळे,पै.प्रशांत चोरे आणि प्राचार्य गावडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निचित डी.एम्.यांनी केले.