जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे या पदवी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ लोणेरे अंतर्गत नुकताच पदवी प्रदान समारंभ पार पडला.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संकुलाचे प्रवेशद्वार ते महा- विद्यालयापर्यंत प्रमुख मान्यवर,प्राचार्य,विभागप्रमुख ,परीक्षाविभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांच्या समवेत मिरवणूक काढण्यात आली.


प्रवरा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्युशन्स चे कॅम्पस डायरेक्टर डॉ.बसवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.पाटील म्हणाले की नवीन संशोधनाच्या जगात तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्ही बी.फार्मसी नंतर उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे.बी फार्मसी नंतर उच्च शिक्षणाच्या त्याच बरोबर करिअरच्या अनेक संधी आहेत गरज आहे ते फक्त कठोर परिश्रम करण्याची आणि नवनवीन येणाऱ्या संधी आत्मसात करण्याची.संशोधन आणि विकास व्यवस्थापनामध्ये देखील बी फार्मसी चे विद्यार्थी अत्यंत कुशलतेने काम करू शकतात.


विविध सरकारी व खाजगी वैद्यकीय संस्थांमध्ये फार्मासिस्ट म्हणून या विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.औषध निरीक्षक म्हणून किंवा सहाय्यक,उप-औषध नियंत्रक म्हणून सरकारी नोकरी मिळू शकते.क्लीनिकल रिसर्च असोसिएट म्हणून देखील बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत चांगले करिअर करता येते.आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या आजच्या काळात जर स्पर्धा करायची असेल तर तुम्ही स्वतःला वेळोवेळी अपडेट करणे व इंग्रजी मध्ये संभाषण कौशल्य वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले.त्याचबरोबर संगणक कौशल्यात पारंगत असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
समर्थ संकुलाचे तांत्रिक संचालक डॉ.चंद्रशेखर घुले यांनी बी फार्मसी नंतरचे उच्च शिक्षण व उपलब्ध संधी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.मार्केट मध्ये सध्या असणाऱ्या कौशल्यपूर्ण शिक्षणाची कौशल्यवान विद्यार्थ्यांची किती गरज आहे यासंबंधीचे मार्गदर्शन केले
.

यावेळी माजी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक वर्ग त्याचबरोबर भौतिक सुविधा,ग्रंथालय,प्रयोगशाळा, उपकरणे इत्यादी बाबत सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.सागर तांबे,परीक्षा विभागप्रमुख प्रा.शितल गायकवाड तसेच तृतीय व अंतिम वर्षातील फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,तांत्रिक संचालक डॉ.चंद्रशेखर घुले,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी , पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे विष्णू मापारी,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,शैक्षणिक समन्वयक प्रा.राहुल लोखंडे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राची पडवळ यांनी,प्रास्ताविक समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.हतपक्की बसवराज यांनी तर आभार प्रा.श्रद्धा खळदकर यांनी मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button