▪️प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
पुणे जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व घनोबा विद्यालय धानोरे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक मोहन दरेकर यांनी दिली. खो खो स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या अर्चनाताई भोसुरे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,दरेकरवाडीचे सरपंच विक्रमराव दरेकर,उद्योगपती हरीश शेठ येवले,संस्थेचे अध्यक्ष संभाजी भालेराव,बापूसाहेब शेळके,विक्रम पानसरे,मारुती कामठे,प्रताप भोसले उपस्थित होते .
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटनपर कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक क्रीडाशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. घनोबा विद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर १४,१७,१९ वयोगटातील मुला मुलींच्या खो खो च्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.
१४ वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल मलठण द्वितीय क्रमांक. संभाजीराव पलांडे पाटील प्रगती विद्यालय मुखई तृतीय क्रमांक ज्ञानवर्धिनी विद्यालय तळेगाव ढमढेरे १४ वर्षे वयोगट मुलीकारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव द्वितीय क्रमांक आर बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे तृतीय क्रमांक संभाजीराव पलांडे पाटील प्रगती विद्यालय मुखई १७ वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल मलठण द्वितीय क्रमांक छत्रपती माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई तृतीय क्रमांक आर बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे १७ वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव द्वितीय क्रमांक भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ तृतीय क्रमांक छत्रपती विद्यालय वडगाव रासाई १९वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ द्वितीय क्रमांक विद्याधाम प्रशाला शिक्रापूर तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल मलठण १९ वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ द्वितीय क्रमांक आर बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे तृतीय क्रमांक. विद्याधाम प्रशाला शिक्रापूर तालुक्यातील या संघांनी विजय मिळविला.
या स्पर्धेदरम्यान जयेशदादा शिंदे,नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथराव हरगुडे,प्रमिलाताई दरेकर,लगड सर,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे,समाज भूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण,पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अशोकराव भंडारे,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष किरण झुरंगे, सुनील दिवटे,एकनाथराव शिवेकर,शामकांत चौधरी,पीएसआय किशोर तनपुरे तसेच धानोरे गावचे उद्योजक संतोषशेठ भोसुरे,मा.सरपंच ज्ञानेश्वर चकोर,संदीप गवारे,भगत सर,शंकर दरेकर या मान्यवरांनी भेटी दिल्या व खेळाडूंचे कौतुक केले. प्रसिद्ध खो खो प्रशिक्षक धीरज दंडवते आसिफ शेख,कुणाल खोंड,मयूर जाधव, बापूसाहेब वडघुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट पंचगिरीचे काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नेटके यांनी तर आभार मोहन दरेकर यांनी मानले.