जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे

नारायणगाव पोलिसांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कांदळी कुतळमळा परिसरातून पाण्याची साडेतीन फूट लांबीची बोअरवेलची इलेक्ट्रिक मोटर व मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2 इसमांच्या नारायणगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या,1 बोअरवेलची इलेक्ट्रिक मोटर व 1 हिरो होंडा पॅशन कंपनीची मोटरसायकल केली हस्तगत*नारायणगाव पोलीस स्टेशन हददीत रात्रीच्यावेळी बोअरवेल मधील इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना नारायणगाव पोलीस स्टेशन हददीमधील बोअरवेलची इलेक्ट्रीक मोटार चोरीमधील संशयित इसम मौजे कांदळी कुतळमळा येथील निजाम कासम पठाण यांचे पोल्ट्री फार्म परिसरामध्ये फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच स.पो.नि. महादेव शेलार सो यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.मोहरे,पो.ना.भुसावरे, पो.ना मंगेश लोखंडे,पो कॉ दत्ता ढेंबरे,शैलेश वाघमारे,गोरक्ष हासे यांचे पथक सदर बातमी मिळालेल्या ठिकाणी रवाना करून संशइत आरोपित *नामे 1) मोहन अनिल माळी वय-18 वर्षे 2)विशाल अंकुश माळी वय-20 वर्षे* दोन्ही रा. श्रीरामपूर, अहदनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नारायणगाव पो.स्टे हद्दीतील मौजे कांदळी कुतळमळा परिसरातून पाण्याची बोअरवेलची मोटार व 1 हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यांचेकडून चोरी केलेला मुददेमाल हस्तगत करण्यात आला असून यातील दोन्ही आरोपींना अटक केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा.मोहरे हे करत आहेत.*सदरची कामगीरी ही मा.अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.रविंद्र चौधर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग व मा.अविनाश शिळीमकर सो स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पो.स.ई पाटील,पो.स.ई धनवे,पो.हवा मोहरे, पो.हवा. कोकने, पो.ना. मगन भुसावरे, पो.ना मंगेश लोखंडे,पो.कॉ दत्ता ढेंबरे पो.कॉ शैलेश वाघमारे,पो. कॉ. हासे,पो. कॉ. कोळी, होमगार्ड कुऱ्हाडे तसेच स्थागुशा चे पो. हवा दिपक साबळे, पो.ना वारे, पो.कॉ अक्षय नवले यांचे संयुक्त पथकाने केली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button