प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
आधुनिक जीवनशैलीत आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होणेआवश्यक असल्याचे मत पंचायत समिती शिरूरचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.० चे शिरूर तालुका स्तरावर ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले हे प्रशिक्षण शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्रतिम नियोजनाने संपन्न होत आहे. शिरूरच्या सेंट जोसेफ हायस्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी या दोन ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी खोडदे पुढे म्हणाले की आधुनिक जगात प्रचंड स्पर्धा असून जग एक खेड बनलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जगाचा कल वाढत असून त्यात आपला विद्यार्थी टिकायचा असेल तर कौशल्य विकसनावर भर देऊन त्याच्या क्षमता वृद्धिंगत करणे गरजेचे आहे तरच तो समोर असलेली आव्हानं समर्थपणे पेलू शकतो.कार्यक्रमाला सेंट जोसेफच्या प्राचार्या न्यांसी पायस,डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ.समीर ओंकार,विशेष साधनव्यक्ती संदीप क्षीरसागर,बेबी तोडमल,संतोष गावडे,स्नेहा खरबस,राहुल आवारी,संजना गावडे,ज्योती जाधव,सारिका चव्हाण तसेच जिल्हासमन्वयक प्रदीप देवकाते,सुलभक म्हणून शहाजीराजे पवार,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,संतोष खताळ,रामचंद्र नवले,मनोज नाईकवाडी,जयश्री पलांडे,प्रशांतकुमार माने,गणेश बांगर,दशरथ होते,आदिनाथ कर्डिले,अशोक कर्डिले,कैलास पडवळ, चंद्रशेखर काकडे उपस्थित होते.