टाकळी हाजी (प्रतिनिधी)
खरं पाहायला गेलं तर विवाह सोहळा हा एक संस्कार, पण याच विवाह सोहळ्याला आपण आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याचा मंच काही जण सजमत आहे.मात्र टाकळी हाजी येथील घोडे परिवार याला अपवाद ठरला असून या परिवाराने लग्नातील अनाठाई खर्च टाळून सामाजिक बांधिलकीचे भान जपत टाकळी हाजी येथील दिव्यांग्यांना स्वाभिमानी,स्वावलंबी, व आत्मनिर्भर बनवणे हेच ध्येय ठरवणारी मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेतील विद्यार्थ्यांना भोजन देऊन व आर्थिक सहाय्य करून आगळावेगळा उपक्रम साजरा केला आहे.
लग्नाच्या अनावश्यक खर्च टाळून लोक डामडौल करत असतात,परंतु अंध अपंग संस्थेतील मुलांना खाऊ तसेच आर्थिक सहाय्य करून आगळावेगळा उपक्रम साजरा केल्याने मनापासून आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया नवरदेवाचे बंधू,दौंड तालुका पशुधन अधिकारी डॉ.विकास घोडे यांनी व्यक्त केली.चि.शरद सोपान घोडे व चि.सौ.का.अपेक्षा संतोष साबळे या उभयातांचा गुरुवार दि.१३-०२-२०२५ रोजी विवाह सोहळा जागतिक कुंड पर्यटन स्थळ टाकळी हाजी येथे संपन्न होणार आहे,लग्नाच्या निमित्ताने कसलाही अनावश्य खर्च न करता घोडे कुटुंबीयांनी अंध अपंग संस्थेत भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन वाटप केले आहे.आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो एवढाच भावनेतून ही मदत करण्यात आली असे नवरदेव शरद घोडे यांनी सांगितले,या संस्थेला वेळोवेळी भविष्यात देखील आम्ही मदत करणार असल्याचे सांगितले,लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून आगळ्यावेगळ्या पद्धतीने उपक्रम साजरा केल्याबद्दल चि.शरद व चि.सौ.का.अपेक्षा यांचे परिसातून कौतुक केले जात आहे.