प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल धामारीचे एकूण ३५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असून त्यांना एकूण १२९६००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश सोनवणे यांनी दिली आहे.एन एमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत १५ तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.मयूर झांबरे,स्वराज चत्तर,श्रेयस डफळ,आदिराज डफळ,आदेश खोत, नैतिक भालेराव,श्रावणी गायकवाड, ओंकार गायकवाड,आदर्श माटुळकर, युवराज कापरे,अक्षरा चव्हाण,समीक्षा राठोड,श्रावणी गायकवाड,स्वस्तिका म्हेत्रे,प्रणव गायकवाड यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती तर धनराज क्षीरसागर,स्नेहा रणदिवे,वीरेंद्र डफळ, हर्षद खिलारी,शिवानी जाधव,प्राजक्ता शिंदे,श्रेया खैरे,प्रांजल साकोरे,संस्कार नालकर,समीक्षा जाधव,प्रज्वला निलख,समीक्षा डफळ,अथर्व साकोरे, पायल तांबे,श्रद्धा कुंजीर,अनुष्का शेळके,श्रावण मोरे,सई साकोरे,आर्यन डफळ,शर्वरी शेळके यांना सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांना गणेश गवळी,सुरेखा गायकवाड,सतिश बनकर,अश्विनी पावसे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेची सततची प्रेरणा,वर्गशिक्षक व सर्व शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे अपार कष्ट,पालकांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना न्यू इंग्लिश स्कूल धामारीचे मुख्याध्यापक राजेश सोनवणे यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष दत्तोबा भगत उपाध्यक्ष सूर्यकांत डफळ सचिव सुनील भाऊ गायकवाड व सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.