महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनात राज्यस्तरीय गुणवंत प्राचार्य पुरस्कार तुकाराम शिरसाट यांना प्रदान करताना उद्योगमंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम व उपस्थित मान्यवर.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे

मुखई .( ता शिरूर )येथील कै.रा.गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम अर्जुन शिरसाठ यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी नाविन्यपूर्ण उपक्रम, भटक्या विमुक्त समाजातील वंचित उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य,इ.८ वी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा व एनएमएमएस परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम केल्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकने शाळेला प्राप्त झालेली आहेत.या उल्लेखनिय कामाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय गुणवंत प्राचार्य पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषामंत्री उदय सामंत तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी हजारोंच्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित होते.या प्रसंगी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने,सचिव राष्ट्रपती विजेते नंदकुमार सागर,अरूण थोरात, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलीक मेमाणे,पुणे जिल्हा संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे,सचिव प्रसाद गायकवाड,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,प्राचार्य अशोक सरोदे,वाल्मीक बांदल,सुधीर ढमढेरे,विज्ञान संघाचे अध्यक्ष संभाजी ठुबे,शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक किशोर गोगावले,मनोज धिवार,पांडुरंग गायकवाड,महेश शिरसाट,रघुनाथ दातीर,रेखा काळे,नागवडे रुपाली, जाधव हनुमंत,रूपसिंग मल्लाव, सविता लिमगुडे,राहुल शेळके,विश्वास साकोरे,अनिल काळे,स्वाती शिरसाट,संदीप लिमगुडे,नंदीनी शिरसाट,कुसूम बांदल आदि मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य शिरसाट यांच्या सार्थ निवडी बद्दल संस्था अध्यक्षा सौ. जयश्री पलांडे,कार्याध्यक्ष ॲड अशोकराव पलांडे,सचिव सुरेश पलांडे सर्व संचालक मंडळ सीईओ मंगेश मोरे व तालुक्यातील तमाम शिक्षण प्रेमींना अभिनंदन केले आहे .

: [मुख्याध्यापक मुख्य महामंडळाच्या ६३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकूण १३ ठराव मंजूर करण्यात आले .१ .प्रामुख्याने दिनांक 1नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान तसेच टप्पा अनुदानावर व नंतर 100% टक्के अनुदानावर आलेल्या २ .शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे . विनाअनुदानित व अंशतः अनुदानित तुकड्यांना प्रचलित पद्धतीनुसार टप्पा अनुदान मंजूर करण्यात यावे .३ . चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पूर्वीप्रमाणेच नियमित वेतन श्रेणी नुसार भरतीसाठी परवानगी द्यावी . प्राचार्य रामदास थिटे .उपाध्यक्ष – पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ ]

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button