टाकळी हाजी (प्रतिनिधी)


टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील कु.केयांश स्वामिनी संदिप चोरे याने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी ११८ गुण मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऊचाळेवस्ती केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे,त्याने राज्यात १७ वा क्रमांक तर पुणे जिल्ह्यात १२ वा क्रमांक मिळविला आहे.त्याच्या यशाबद्दल परिसरातील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.नुकत्यात झालेल्या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,त्याला मार्गदर्शन मुख्याध्यापिका मंगल सखाराम गावडे यांनी केले असून या यशाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे, पंचायत समिती माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच मोहन चोरे,सारिका उद्योग समूहाचे रामदास चोरे,पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे,सविंदणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक राजेंद्र चिकटे, युवा उद्योजक संदिप चोरे यांनी अभिनंदन केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button