जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
ओतूर येथील ग्राम विकास मंडळाचे उदापुर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक दिनाचे निमित्ताने विद्यार्थीच एकदिवसीय शिक्षक झाल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी दिली.माजी राष्ट्रपती स्वर्गीय सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी इयत्ता दहावी (अ) विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षकांच्या भूमिकेत वावरत होते.वर्ग नियंत्रण करताना किती अडचणी येतात त्याचप्रमाणे अध्यापन करताना किती तयारी करावी लागते याची अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली.अगदी शाळा भरल्याची घंटा देण्यापासून ते वर्गसाफसफाई,अध्यापन,स्वच्छता, प्रार्थना या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीने पार पाडल्या.
एक दिवशी मुख्याध्यापक म्हणून कीर्ती बटवाल तर उपमुख्याध्यापक म्हणून रिद्धी वाळेकर,पर्यवेक्षक म्हणून चैतन्य बनकर यांनी काम पाहिले तर शिक्षक प्रतिनिधी व इंग्रजी शिक्षक म्हणून ऋतुजा भोर हिने मार्गदर्शन केले.सर्वात प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी स्व.डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी जेष्ठ शिक्षक अनिल उकिर्डे, साधना तांबे,शिक्षक प्रतिनिधी:-संतोष कांबळे, आशा गाडेकर,लतिफ मोमीन,साईनाथ भोर,रोहिणी घाटकर,मंगेश कोंढार,दशरथ भाईक,योगेश गाढवे, सारिका डांगे,सावंतबाई,तर शिक्षकेतर कर्मचारी योगेश फापाळे,काळे व विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
सृष्टी अमूप,श्राव्या बनकर आर्या वाळेकर,प्राची पवार,कीर्ती बटवाल आदींनी शिक्षक दिनाविषयी मनोगत व्यक्त केली व शिक्षकांबद्दल आदरभाव व्यक्त केला.समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यम कुलवडे याने तर सूत्रसंचालन श्रद्धा अमूप हिने केले. रचना भोर हिने आभार मानले.या विद्यार्थ्यांना सर्व विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले.