जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिक्षकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओतूर येथे शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता.या सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बाल साहित्यिक,लेखक,कवी उत्तम सदाकाळ’ उपस्थित होते.त्यांनी आपल्या व्याख्यानात “चला जपू या नाती” या विषयावर बोलताना शिक्षक,आई,वडील यांच्या संस्कारांचे आपल्या जीवनातील महत्व श्रोत्यांना पटवून दिले.
उत्तम सदाकाळ यांची ‘आईची माया’ ही कथा ऐकताना तमाम श्रोतावर्गाचे डोळे अश्रूंनी अक्षरशः डबडबले होते.तर “कुणास सांगू” ही कविता ऐकताना सगळे रसिक खळखळत्या हास्यात बुडाले होते.उत्तम सदाकाळ यांच्या रंगतदार व्याख्यानानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम दत्तात्रय तांबे यांनीही डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनप्रवास व कार्याचे महत्व रसिकांना पटवून दिले.या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेले शिक्षक व सेवेत असलेले शिक्षक अशा तब्बल ३०० गुरूजनांचा भेटवस्तू देवून सत्कार केला गेला.यासाठी ओतूर व ओतूर परिसरातील शिक्षक बहुसंखेने उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमास मोहित ढमाले माजी जि.प. सदस्य,प्रशांत डुंबरे सरपंच,ग्रा.पं. ओतूर, जयसिंग मारुती डुंबरे अध्यक्ष,जय बजरंग सेवा गणेश मंडळ,शंकरराव दशरथ पा.डुंबरे उपाध्यक्ष,जय बजरंग सेवा गणेश मंडळ,अशोक गोपाळराव डुंबरे,गोरक्षनाथ फापाळे हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नेटके नियोजन धोंडिभाऊ मोरे व माजी शिक्षण विस्तार अधिकारी उल्हासराव तांबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश डुंबरे यांनी केले.
सदर कार्यक्रम ग्रामपंचायत ओतूर,जय बजरंग परिवार,कवठे येमाई परिवार,उत्कर्ष गणेश मंडळ,जय मल्हार गणेश मंडळ,आनंदी सफर ग्रुप, शिवकृपा ग्रुप, रणरागिणी ग्रुप, शिवछत्रपती गणेश मंडळ, पाटील आळी,संत निरंकारी मंडळ,ओतूर यांचे मार्फत आयोजित करण्यात आला होता.