जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जुन्नर अंतर्गत बिट ओतूर क्रमांक ०३ मार्फत पोषण माह समारोह कार्यक्रम उदापुर येथील ग्रामपंचायत कार्यल- यातील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.”सही पोषण,देश रोशन “कार्यक्रमाची सुरुवात दिंडीच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी ठिकेकरवाडी,आहिनवेवाडी,सारणी ,मांदारणे,साबरवडी,शिंदेवाडी,चौधरवाडी,काळभैरवनाथ नगर,ढमालेमळा आणि उदापुर बिट ओतूर क्रं:-तीन मधील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस व पोषण दिंडी मध्ये मोठ्या संख्येने महिला पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. पोषण माहच्या कार्यक्रम उदघाटन प्रियदर्शनी पतसंस्था अध्यक्षा,माजी उपसरपंच डॉ.पुष्पलता शिंदे व पर्यवेक्षिका समिक्षा दगडे,यांचे शुभहस्तेदीपप्रज्वलन तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी श्रीफळ अर्पण करून करण्यात आले.पोषण माह निमित्ताने अंगणवाडी बालकांनी हाट बाजारची मांडणी केली होती.पालकांनी भाजीपाला खरेदी करुन बालकांना प्रोत्साहन दिले.आदर्श परसबाग मॉडेल उभारण्यात आले प्रदर्शन आकर्षक पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी मांडले होते.आहार प्रदर्शन व पोषण गुढी उभारून त्यामार्फत पोषणा संदर्भात संदेश देण्यात आले.
सुकन्या शिंदे या गरोदर मातेचे ओटीभरण करण्यात येऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.६ महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अर्धवर्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला व ६ महिने फक्त आईचेच दूध बाळाला देण्याचे आवाहन पोषण गीता मार्फत अंगणवाडी सेविकांनी केले.पोषण हंडी अंगणवाडीच्या मंगळागौरी गीतातून पोषणाचे संदेश देखील दिले.मान्यवरांचे हस्ते पोषण माह मध्ये उत्तम काम केलेल्या पर्यवेक्षिका,सेविका, मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.अंगणवाडी बालकांनी विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितीतांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदापूर ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या डॉ. पुष्पलता शिंदे होत्या यावेळी ग्रामपंचायत सदस्या छाया चौधरी,चैत्राली शिंदे,कविता भोर,वर्षा वल्व्हणकर,जयश्री होनराव,जयश्री भोकरे,योगिता डबीर,चित्रा अमूप,सविता शिंदे,सरस्वती विद्यालय विद्यार्थीनी व उपशिक्षक रोहिणी घाटकर,पर्यवेक्षिका समिक्षा दगडे,पंचायत समिती महिला बचत गट अधिकारी मधुकर ठोगिरे आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर आणि बिट ओतूर:-३ मधील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस महिला पालक व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम सूत्रसंचालन मनीषा भोर यांनी तर आभार प्रदर्शन जानकी शिंदे यांनी केले.
महिला व बालकल्याण विभागामार्फत १ ते ३० सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून राबविला जातो. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जुन्नर अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान राबविले व त्याला खऱ्या अथानें जनआंदोलन चे स्वरूप प्राप्त करुन देण्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची महत्वाची भूमिका आहे.:-समिक्षा दगडे:-पर्यवेक्षिका बिट ओतूर :-3