जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
दिनांक १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सर्व शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्व कुटुंबियाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन करण्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीमध्ये सततच्या ऑनलाईन माहित्या मागविणे,विविध लिंक भरणे,विविध उपक्रम राबविणे, त्यांची माहिती तातडीने देणे,सेतू अभ्यासक्रम तसेच पायाभूत चाचण्या घेणे, पेपर तपासणे, शालेय पोषण आहार योजना राबविणे,शिक्षण परिषद व प्रशिक्षणांना उपस्थित राहणे,त्या संदर्भात लिंक भरणे,शालेय व्यवस्थापन समिती बैठका घेणे, इतिवृत्त लिहिणे, विनोबा ॲपवर सातत्याने माहिती भरणे,पाठ्यपुस्तक व गणवेश योजना राबविणे यासारख्या विविध अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक व विद्यार्थी अध्यापना- पासून दुरावला असून मानसिक दृष्ट्या त्रस्त झालेला आहे.त्यामुळे अर्थातच प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
जुन्नर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची “आम्हाला शिकवू द्या”ही शासनाकडे आग्रहाची मागणी असून अशैक्षणिक कामे व अतिरिक्त ऑनलाईन कामे याचा निषेध म्हणून दिनांक ५ सप्टेंबर २०२३ शिक्षक दिनी सर्व शिक्षक काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत अध्यापनाचे काम करणार आहे. वरील मागण्यांबाबतचे निवेदन जुन्नर तालुका पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी मा.डाॅ.महेश शेजाळ साहेब व गटशिक्षणाधिकारी मा.अनिता शिंदे यांना देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे,उपाध्यक्ष विनायक ढोले,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुशिला डुंबरे, तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे, कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,सरचिटणीस प्रभाकर दिघे,सभापती विजय लोखंडे,नेते विश्वनाथ नलावडे, संदीप शिंदे,राजेंद्र चिलप,भरत बोचरे,सदू मुंढे, दिपक मुंढे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शुभदा गाढवे,मनीषा डोंगरे, वैशाली कु-हाडे,सुनिता वामन,सुरेखा औटी,प्रमिला आमले,रवींद्र वाजगे,संतोष पाडेकर,जितेंद्र मोरे,सुनील हाडवळे,राम वायळ,प्रशांत ढवळे,नवनाथ ढोले, गणेश कवडे, भानुदास बटवाल व संघ शिलेदार उपस्थित होते.