जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीची पहिली सभा,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर या ठिकाणी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी महा- विद्यालयाचे प्राचार्य तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ.अभय खंडागळे यांच्या अध्यक्षते- खाली संपन्न झाली.उद्घाटन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सहाय्यक संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षणसंचालक डॉ.दत्ता महादम,कक्षाअधिकारी:-शिवाजी उत्तेकर, आधीसभेचे सदस्य डॉ.रमेश गायकवाड,अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.भरत भुजबळ,माजीसचिव डॉ. सुहास भैरट,जेष्ठप्राध्यापक प्रा.शैलेंद्र कांबळे व विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.
सदर सभेसाठी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती कार्यक्षेत्रातील ३५० महाविद्यालयांपैकी ६७ महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा केली व मागील वर्षीच्या खेळाडू तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालकांच्या कार्याचा आढावा घेऊन नैपुण्य प्राप्त मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला व शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक तयार करण्यात आले.सदरचे वेळापत्रक पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या संकेत स्थळ www.pdzsc.in वर उपलब्ध आहे.
प्रथम सभेचे आयोजन पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्श नाखाली पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेशराज पनेरू यांनी केले होते.
सदरची सभा यशस्वी होण्याकरिता सूत्रसंचालक डॉ.डी.एम.टिळेकर, डॉ.वाळके एस.बी.,डॉ. कुंडलिक व्ही.डी, श्री.जयसिंग डुंबरे, श्री.निखिल काकडे व सर्व महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.