शुभम वाकचौरे
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी -सुमन संखाराम साळवे वय ४४ वर्ष व्यवसाय गृहीणी रा बगाडरोड रामलिंग शिरूर, यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत अशी की -दि.२० रोजी फिर्यादीचे घराचे शेजारी असणारी शाळा सेट जोसेफ इंग्लिश मिडीअम शिरूर येथे रात्री १०:३० वाजता चे सुमारास डी जे वाजण्याचा कर्कश आवाज येत होता.फिर्यादी ची मुले यु.पी.एस.सी चा अभ्यास करत असल्याने त्यांनी शाळेचे गेटवर जावुन वॉचमन कडे चौकशी केली असता त्यांनी शाळेचे आतमध्ये कोणालातरी फोन केला. त्यावेळी वॉचमने सांगितले की, तुम्हालाच आतमध्ये बोलाविलेले आहे. म्हणुन फिर्यादी व त्यांचा मुलगा असे दोघेही शाळेचे आतमध्ये गेले तेव्हा पुरुष व महीला असे १० ते १५ दारूचे नशेत असल्याचे दिसुन आले म्हणून फिर्यादी त्याचा व्हिडीओ प्रिसिपल मॅडमला दाखविण्यासाठी काढत असताना, तेव्हा प्रिसिपल मॅडम ज्ञानसी पायस व इतर २ महीला आल्या त्याचे देखील तोंडाचा दारू पिल्यासारखा वास येत होता म्हणून फिर्यादी नी मॅडम ज्ञानसी पायस यांना डी जे चा आवाज कमी करा असे म्हणाले असता त्या मला म्हणाल्या की, तु कोण असे म्हणुन इतर लोकांना म्हणाल्या की हिला धरून ठेवा आणि पोलीसांना बोलवा असे म्हणाल्या व तेव्हा हे सगळे दारूच्या नशेत असल्याने फिर्यादी बाहेर निघाले तेव्हा बाहेर जात असताना मॅडम (पुर्ण नाव माहीत नाही) यांनी फिर्यादीला लाथ मारली व त्यांचा मोबाईल घेतला व मुलगा जिवण सखाराम साळवे यास सुरेश चौघुले याने गचांडले व इतर त्याचे साथीदार यांनी देखील धक्काबुक्की केली परतु अंधार असल्यामुळे किती व्यक्ती होत्या ते दिसले नाही. त्यांनतर प्रिंसीपल मॅडम यांनी फिर्यादी व त्यांचे मुलाचे विरूध्द पोलीस स्टेशन शिरूर येथे खोटी तक्रार दिली आहे.त्यांनतर सुरेश चौघुले व अभिषेक जाधव हे रस्त्याने येत जात असताना शिवीगाळ करून फिर्यादीचा मुलगा जिवण याला खल्लास करून टाकतो अशी धमकी देवुन तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणुन त्रास दिला आहे. म्हणून फिर्यादी यांनी वरील आरोपी विरोधात फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.