जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ग्रामविकास मंडळ,ओतूर संचलित उदापुर ता:-जुन्नर येथील सरस्वती विद्यालयात नुकताच स्थापन झालेल्या इन्ट्रॅक्ट रोटरी क्लबच्या अध्यक्षा ऋतुजा भोर हिने आपल्या सहकारी सदस्यांच्या नियोजनानुसार करून “”एक राखी पोलीस बांधवांसाठी””हा स्तुत्य उपक्रम विद्यालयात राबविला या उपक्रमात ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते.
अहोरात्र मेहनत करून समाजात एकोपा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जबाबदारीने काम करण्याऱ्या पोलीस बांधव आपल्याखात्याच्या बोध वाक्यानुसार म्हजेच “सद् रक्षणाय, खल निग्रणाय” आपल्या कर्तव्य पूर्ण करीत असतात म्हणूनच यावर्षी कर्तव्यदक्ष पोलीस बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचा सत्कार क्लबच्या अध्यक्षा ऋतुजा भोर हिने राखी बांधून,शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन केले व उपस्थित सर्व पोलीस बंधूंना राख्या बांधून क्लबच्या सर्व संचालक मुलींनी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या दिमाखात साजरा केला यावेळी अध्यक्षा ऋतुजा भोर हिने आपल्या मनोगतातून पोलीस बंधू यांच्यावर स्तुतीसुमने उधळत समाजातील सर्व महिलांच्या सुरक्षित भविष्याची कामना पोलीस बंधु निश्चितच करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सरस्वती विद्यालय,ही महामार्गावरील उदापुर ग्रामपंचायत हद्दीत जुनी शाळा म्हणून ओळखली जाते इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतचे मुलं मुली येथे शिक्षण घेतात.शाळेतील मुलामुलींना अभ्यासाचे धडे देण्याबरोबरच समाजात मानाने जगण्यासाठी योग्य नागरिक तयार होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले जाते.भविष्यात उच्च पदावर कार्यरत असताना समाजातील तळागाळातील लोकांची सेवा करण्याचे मार्गदर्शन केले जाते.असे गौरव उदगार काढुन मुलींनी न घाबरता धाडस दाखविले पाहिजे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सुरक्षितता पुरविणे आमचे आद्य कर्तव्य मानतो असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार,जेष्ठ शिक्षक अनिल उकिर्डे, शिक्षक प्रतिनिधी संतोष कांबळे,साईनाथ भोर, योगेश गाढवे,लतिफ मोमीन, दशरथ भाईक,रोहिणी घाटकर,आशा गाडेकर,इन्ट्रॅक्ट रोटरी क्लबचे सचिव श्रवण अमूप,खजिनदार आर्या वाळेकर,सृष्टी अमूप ,कीर्ती बटवाल, प्राची पवार ,साईराम शिंदे,ऋग्वेद तांबे,वेदांत भोर, सार्थक बुगदे उपस्थित होते.