निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण/शहर यांची नियोजित सहविचार सभा पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे मॅडम व वेतन पथक अधीक्षक श्री.कठाळे साहेब व श्री.गंभीरे साहेब यांच्या समवेत संपन्न झाली.
सदर सहविचार सभेमध्ये पुणे जिल्ह्यामधील शिक्षकांचे संवेदनशील असणारे शिक्षणाधिकारी स्तरावरील विषय,वेतन पथक कार्यालयातील विविध प्रश्न, वैयक्तिक प्रश्न व विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रम आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वेतन,भविष्य निर्वाह निधी हिशोब पावत्या,थकीत वेतन, वैद्यकीय बिले,वैयक्तिक मान्यता,निवड श्रेणी मान्यता पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक मान्यता,भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरण,बीएड श्रेणीवाढ मान्यता,सेवा जेष्ठता,सेवा हमी कायदा व इतर प्रलंबित कामांचा निपटारा व वैयक्तिक प्रश्नांची साधक बाधक चर्चा करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचे सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रांत सदस्य श्री संजय सातपुते सर,पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.निलेश काशिद,कार्यवाह श्री.महेश शेलार, कार्याध्यक्ष श्री.प्रमोद काकडे,उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब खोसे व श्री.जितेंद्रकुमार थिटे, कोषाध्यक्ष श्री.कैलास शिंदे,शिरूर तालुकाध्यक्ष श्री.अशोक दहिफळे,मावळचे तालुकाध्यक्ष श्री.लक्ष्मण मखर,जुन्नर तालुकाध्यक्ष श्री.कैलास कर्पे,आंबेगाव तालुकाध्यक्ष श्री.विजय साळवे,खेडचे कार्यवाह अरविंद गवळे, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी श्री.भारत काळे,मिलिंद सोनवणे,विठ्ठल गवारी,शहरातील पदाधिकारी सुरेश रणदिवे शहराध्यक्ष ,विष्णू मोरे कार्यवाह,संगीता खेर कोषाध्यक्ष,नंदू रणधीर कार्याध्यक्ष,ज्योती मानकर उपाध्यक्ष,प्राची गुमासते महिला आघाडी प्रमुख,हनुमंत भांडवलकर संघटन मंत्री,रेश्मा दिक्षित कार्यालयीन मंत्री,गोपाळे सर शिवाजी नगर प्रमुख,निकुंब सर कार्यकारिणी सदस्य,गवते सर पुणे कॅन्टोन्मेंट प्रमुख,व इतर सर्व मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते.