प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
भारताचे महान हॉकीपटु मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजे 29 ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या क्रिडा दिनानिमित्त देशवासीयांना खेळाबाबत जागरूक करण्यासोबत त्यांना तंदुरुस्त राहण्याच्या सूचनाही दिल्या जातात. मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या हॉकी कारकिर्दीत ५०० हून अधिक गोल केले.
भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री वाघेश्र्वर विद्याधाम मांडवगण फराटा ता. शिरूर या प्रशालेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य रामदास चव्हाण,उपप्राचार्य जयंत जोशी, पर्यवेक्षक गणपत बोत्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश ढमढेरे, म. गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हनुमंत फराटे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन फराटे, संतोष फराटे यांचे हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये तालुकास्तरीय शालेय योगासने आणि कुस्ती स्पर्धेमध्ये विजयी झालेले आणि जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा पदके देऊन सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे हूशार, होतकरू विद्यार्थी आणि खेळाडू यांचाही ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येकी १ स्कूल बॅग,६ फुलस्केप वह्या,१ कंपास बॉक्स आणि १ रायटिंग पॅड असे शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त करून कर सहाय्यक व मंत्रालय लिपीक पदी निवड झालेले याच प्रशालेचे माजी विद्यार्थी मेजर नवनाथ सावळेराम दुर्गे यांचा प्रशलेतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराने आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वि.का.स.सोसायटीचे उपाध्यक्ष अमोल जगताप, संतोष फराटे, तुषार चकोर, मल्ल सम्राट स्वप्नील शितोळे, सूवर्णाताई जगताप, क्रीडा मार्गदर्शक दादासाहेब उदमले, राम जगताप, राजुभाऊ कांबळे, माऊली फराटे, हनुमंत पंडित, मल्हारी उबाळे, मिलिंद निंबाळकर, राजेंद्र कांबळे, नितीन गवळी, दिलीप वराळे, अतुल काराळे, संजय पारखे, विजय काराळे, स्वाती दळवी, अनिता परहर, सर्व शिक्षक, आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी यांनी केले.