जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
उदापूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळ ओतूरच्या संचलित सरस्वती विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बनवण्याचा व मेंदी उपक्रम संपन्न केला .यावर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम करण्याचे ठरविले चित्रकला विभागाच्या प्रमुख रोहिणी घाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी विविध रंगांच्या राख्या बनविल्या व आकर्षक मेहंदी डिझाइन हा उपक्रम राबविला.
विद्यार्थिनींमध्ये सर्जनशीलतेचा विकास व्हावा त्यांनी नाविन्याची कास धरावी त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण व्हावे.आपले सण-समारंभ या ज्या परंपरा आहेत त्यांचे जतन करण्यासाठी हा उपक्रम विद्यालयां मध्ये राबविला जातो.विद्यालयाचे उपक्रम अतिशय चांगला मानला जातो.विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार जेष्ठ शिक्षक अनिल उकिरडे व शिक्षक प्रतिनिधी संतोष कांबळे उपशिक्षक साईनाथ भोर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.