जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर व द सिविलियन अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनातून करण्यात आले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.डी.सोनावणे तर कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून द सिविलियन अकॅडमीचे मुख्य समन्वयक अजित खराडे आणि जनसंपर्क अधिकारी वैभव वारे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
अजित खराडे म्हणाले “विद्यार्थ्यांनो मनामध्ये जिद्द आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर अधिकारी होणे शक्य आहे. जुन्नर तालुका हा ऐतिहासिक तालुका असून मुंबईपासून जवळच असलेल्या आपल्या तालुक्यात अनेक सुविधा विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. केवळ शेती आणि उद्योगधंद्यांवर अवलंबून न राहता प्रशासनात देखील आपण कार्य करायला हवे, प्रशासनात कार्य करण्याची इच्छाशक्ती आणि जिद्द तुमच्या मनात असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करून अधिकारी होता येते. आजपर्यंत जे अधिकारी अधिकार पदापर्यंत पोहोचले त्यांची परिस्थिती देखील आपल्यासारखी गरिबीचीच होती. ती देखील शेतकऱ्यांचीच मुलं होती. गोरगरीब समाजातूनच आजपर्यंत अनेक अधिकारी निर्माण झालेले आहेत हे विसरून चालणार नाही. अधिकारी होणे हा काही वेगळा भाग नसून बालपणापासून तर महाविद्यालय स्तरापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो नीट अभ्यासल्यास आपल्याला असे दिसून येते की संपूर्ण स्पर्धा परीक्षा ही पहिली ते पदवी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरच आधारलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक जिद्द असते.निसर्गतः असते शक्तिमान असतात त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास असतो त्या आत्मविश्वासाला जागृत करून आपण गगनभरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले”.
कार्यशाळेचे दुसरे वक्ते वैभव वारे म्हणाले महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या सदन भागातून विद्यार्थी कमी अभ्यास करतात तर मागास भागातून अधिकारी होण्याचे प्रमाण जास्त आहे याचे कारण म्हणजे त्यांची परिस्थिती आणि निसर्गतः त्यांच्यामध्ये असलेली जिद्द होय. म्हणून आपणही स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये कुठेही कमी न पडता चांगला अभ्यास करून महाविद्यालयात असलेल्या मूलभूत शैक्षणिक सोयीसुविधांचा उपयोग करून घ्यावा”.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के डी सोनावणे म्हणाले “महाविद्यालयात राबवल्या जाणारे उपक्रम हे विद्यार्थी हिताचे असतात. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा स्वतःसाठी फायदा करून घ्यावा त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांसह समाजाचे आणि महाविद्यालयाचे भविष्य उज्वल करावे. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास कुठल्याही शैक्षणिक कार्यासंबंधी महाविद्यालयातील सर्व स्टाफ तुमच्या पाठीशी आहे त्यांना कुठलीही अडचण तुम्ही विचारू शकता असे ते म्हणाले”.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. नंदकिशोर उगले यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे यांनी तर आभार महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.वसंतराव गावडे यांनी मानले सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील भूगोल विभागातील व्याख्याते डॉ. निलेश काळे, वाणिज्य विभाग प्रमुख व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनील लंगडे, डॉ. रमेश काशीदे, डॉ.संतोष वाळके, डॉ.अनिल लोंढे,डॉ. रमाकांत कस्पटे,डॉ.राजेंद्र अंबावने आदींनी परिश्रम घेतले.