प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ आवश्यक असून शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी व्यक्त केले ते जिल्हा क्रीडा परिषद व अजिंक्यतारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे होते.

आधुनिक काळात प्रचंड स्पर्धा असून त्यात टिकायचे असेल तर शारीरिक क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर तालुक्याचे गटविकास अधिकारी महेश डोके विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन पारंपारिक व्यायामाची सवय अंगीकारली पाहिजे व आपल्या आहारात जंकफूडचा अतिवापर टाळून पौष्टिक व निरोगी आहार घेण्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे देखील डोके यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरी उपयोगिता व बुद्धीकौशल्य असून ती उपयोगीता व बुद्धीकौशल्य विकसित करण्याचे उत्कृष्ट काम शिक्षक करत असल्याचे मा.जि.प सदस्या रेखाताई बांदल उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या व या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले शिरूर तालुक्याचा क्रिडा संकुलाचा प्रश्न कित्येक दिवस प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज यावेळी संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे यांनी बोलून दाखवली त्याला उपस्थितीतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने तालुक्यातील १३८ संघांनी भाग घेतला तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातील क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांनी स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली.कार्यक्रमाला मा.सभापती सुभाष उमाप,अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे प्रमुख व पुणे जिल्हा कुस्तीगार संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब कापरे,अनिल काशिद,सामाजिक कार्यकर्ते जयाभाऊ विरोळे,शिरूर तालुका कुस्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झेंडू पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा जितेंद्रकुमार थिटे,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष कैलासराव खंडागळे, दादासाहेब उदमले, विज्ञान गणित संघटनेचे अध्यक्ष संभाजी ठुबे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी तर आभार प्राचार्य संतोष मासळकर यांनी मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button