प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
आरोग्याधिष्ठीत पिढीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचे मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले ते तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य धरमचंदजी फुलफगर हे होते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर जि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. नंदकुमार निकम पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत प्रत्येकाने व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे गरजेचे आहे.उत्साहात संपन्न होत असलेल्या या क्रीडा स्पर्धांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या दरम्यान मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते म्हणाले संस्थेच्या माध्यमातून अनेक क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि त्यामुळे तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होत आहे या स्पर्धेसाठी तालुकाभरातून विविध शाळा व महाविद्यालयातून १४०० विद्यार्थी व १००० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.दि११ व १२सप्टेंबर २०२४ रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.एच.एस.जाधव,पर्यवेक्षक ए. एस.वणवे,जिमखाना विभाग प्रमुख डॉ.डी. एच.बोबडे,शारीरिक शिक्षण संचालक डॉ.ए.एम चव्हाण,शारीरिक शिक्षक वाय.के.आव्हाड,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,कैलासराव खंडागळे,किरण झुरुंगे,शामकांत चौधरी,जेष्ठ क्रीडा शिक्षक दादासाहेब उदमले,सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश चव्हाण,आरोग्य विभागाच्या टीमसह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील ७५ शाळा आणि २२ कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डी.एच.बोबडे,सूत्रसंचालन वाय.डी.वारे तर आभार डॉ.ए.एम.चव्हाण यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.