पालकांनी ‘शिक्षक दिनी’ चालवली शाळा ———————————————
प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, केंदूर येथे ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. मात्र यावर्षी सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनि. कॉलेज केंदूर येथे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षित पालक *एक दिवस शाळेसाठी एक दिवस ज्ञानासाठी*
या उपक्रमातून एकत्र येऊन त्यांनी शिक्षकदिनी शाळा चालविण्याचे ठरवून ईच्छा बोलून दाखविली व त्यास विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अशा प्रकारे वर्षानुवर्षे शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी शिकविण्याच्या परंपरेला छेद देत एक नविन उपक्रम यशस्वीरित्या राबविला गेला. पालकांनी शिक्षकदिनी शिकविण्याच्या, शाळा चालविण्याच्या या उपक्रमासाठी पालकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या अनोख्या उपक्रमाचे केंदूर पंचक्रोशीतून, समाजातील विविध घटकातून कौतुक होत असल्याचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगीतले. या वेळी बोलतांना आपल्या् पालकातून मुख्याध्यापक झालेले श्रीहरी प-हाड यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या भौतिक, शैक्षणिक प्रगतीविषयी माहीती दिली.पालकातून झालेले शिक्षक यांनी आपले वर्गातील अनुभव व्यक्त करतांना सांगीतले की, वर्गात दिवसभर उभे राहुन शिकविणे हे कठीण काम आहे, तसेच त्यांनी अनेक अडचणींचा पाढाच वाचला त्यामुळे शिक्षकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
पालकांमधून मुख्याध्यापक श्रीहरी प-हाड, पर्यवेक्षक संदीप सुक्रे, पालकांमधून शिक्षक सतिश थिटे, योगिता थिटे, मयुरी खर्डे, स्वप्नील थिटे, कविता गावडे, कोंडीभाऊ थिटे, ऋतुजा साकोरे, रेश्मा गावडे, जयश्री ताठे, वंदना साकोरे, शिला सुक्रे, अश्विनी सुक्रे, सुवर्णा सुक्रे,पुजा थिटे, आशा दळवी, उज्ज्वला ताठे, मनिषा थिटे, बाजीराव भोसुरे, दिपाली थिटे,प्रतिमा भोसुरे उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे व शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक यांचा सन्मान मा.नामदार दिलीप वळसे पाटील यांचे कडून करण्यात आला यासाठी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले उपस्थित होते. यावेळी शिरूरच्या माजी उपसभापती सविताताई प-हाड, विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे, सरपंच अमोल थिटे, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, शाहुराज थिटे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सतिश थिटे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष संदीप सुक्रे, माता-पालक संघ उपाध्यक्ष मयुरी खर्डे, भाऊसाहेब थिटे, भरतशेठ साकोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतिश थिटे यांनी केले, तर आभार मयुरी खर्डे यांनी मानले.