निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
निर्वी (ता.शिरूर) येथे तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला मुख्याध्यापक विष्णू करपे, सुधीर थोरात, डोळस सर, सचिन नलगे, नितीन मिसाळ, सोनबा ठाणेकर, रणसिंग ताई शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक प्रमुख संगीता दहिफळे यांनी नागपंचमी या सणाचे महत्व तसेच या सणाविषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले. विद्यालयातील एकूण दीडशे विद्यार्थिनींनी या भोंडल्यामध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा केले होत्या. संगीता दहिफळे तसेच ऐश्वर्या डोंगरे यांनी भोंडला गीतेची पारंपारिक गाणे सादर केले. विद्यार्थिनींनी फेर धरून नृत्य सादर केले. तसेच पारंपरिक गाण्यांवरती विद्यार्थिनींनी फुगडयांचा आनंद लुटला. तसेच शिक्षिकेनेही विद्यार्थिनींनी बरोबर फुगडयांचा पारंपारिक गाण्यांचा आनंद लुटला.
आयलमा फैलमा एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू अशा प्रकारचे भोंडला गीत सादर केले या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख संगीता दहिफळे तसेच ऐश्वर्या डोंगरे यांनी केले होते.