निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
( न्हावरा येथे कृषि योजना माहिती मेळावा संपन्न) कृषी विभागाच्या योजना शेतकरी हितार्थ व उन्नती साठीच असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक सबलता आणावी असे आवाहन कृषी योजना जनजागृती मेळाव्यात कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले .
न्हावरा ता शिरूर येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका कृषी अधिकारी शिरूर कार्यालयाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमात कृषी सहायक जयवंत भगत यांनी महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे जसे कि रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र पाचट कुटी तसेच कुटी मशीन फवारणी पंप ब्लोअर ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना शेततळे अस्तरीकरण योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेडनेट पॉलीहाऊस पॅक हाऊस शीतगृह प्रोटेक्शन पेपर सामुहिक शेततळे तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पिक विमा हवामान आधारित फळपिक विमा योजना पिक स्पर्धा पौष्टिक तृणधान्य अभियान प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगास अर्थसहाय्य शेतकरी गट फार्मर कंपनी स्थापना करणे शेतकरी अभ्यास दौरा शेतकरी मासिक योजना कृषीरत्न पुरस्कार सह विविध पुरस्कार अशा विविध योजना बाबत सविस्तर माहिती जयवंत भगत यांनी दिली.
कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड कृषी पर्यवेक्षक कांतीलाल वीर शिवाजी गोरे तसेच ग्रामस्थ उत्तम सोनवणे, दत्तात्रेय तरटे,विनायक राजेनिंबाळकर,तान्हाजी राजेनिंबाळकर,तुषार साठे,संदीप साठे,सोमनाथ कोळपे,नितीन हांडे, पोपटराव जगदाळे, किसन बिडगर,राजू बिडगर आणि कृषी विभागाचे कृषी सहायक सागर पवार,मोनिका झगडे,शीतल गुलदगड,अमोल जाधव उपस्थित होते.कार्यक्रमासाठी विशेष योगदान न्हावरा गावचे कृषी सहायक सुनिल नाईक यांनी दिले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल वीर यांनी केले.