निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
गुनाट ता शिरूर जि पुणे येथे योगेश गाडे दिपक भोरडे निळकंठ गव्हाणे यांनी एक डोळा पध्दतीने ऊस लागवड करुन उत्कृष्ट उत्पादन सातत्याने घेत असुन या वर्षी योगेश गाडे यांनी संपूर्ण ऊस लागवड एक डोळा पध्दतीने केली आहेतालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूर वतीने क्रॉपसॅप अंतर्गत विनाअनुदानित शेतीशाळा उपक्रम सुरू केला असुन योगेश गाडे यांचे क्षेत्र पिक प्रात्यक्षिक साठी निवडण्यात आले आहे सदर क्षेत्रात ऊस लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे उत्पादन घेतले जाणार आहे बेसल डोसचा वापर तण नियंत्रण जीवाणु खतांचा वापर आंतरमशागत फुटवे नियंत्रण पाणी व्यवस्थापन किड व रोग व्यवस्थापन अभ्यासपूर्वक केले जाणार आहे सध्या सदर प्लॉट मध्ये एक डोळा पध्दतीने ऊस लागवड केली असुन लागवडी नंतर दुसऱ्या दिवशीच मेट्रीब्युझीन या तणनाशकाची फवारणी केली आहे बेसल डोसचा वापर केला असुन हुमणी नियंत्रण साठी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट पुणे येथून कमी खर्चात ईपीएन आणले असून हुमणी नियंत्रण साठी होणारा किटकनाशकासाठी हजारो रुपये बचत करण्यात आली आहे जीवाणू खते वसंत ऊर्जा संजीवके त्यांनी व्हि एस आय येथून आणली आहे कृषी सहायक जयवंत भगत त्यांना मार्गदर्शन करीत असून आजच्या शिवार फेरी साठी व शेतीशाळा उपक्रम साठी निळकंठ गव्हाणे नामदेव वडघुले अमोल भोरडे दिपक भोरडे विठ्ठल भगत सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते सदर कार्यक्रम दर महिन्याला घेण्यात येणार असुन परिसरातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले आहे