जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील अनेक युवा शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे पिक घेऊन भरघोस उत्पन्न घेत आहेत नुकतेच जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील कोपरे गावाच्या काठेवाडीतील रमेश बांगर या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचे यशस्वी पीक घेऊन अनेकांची मने जिंकली आहेत आता उदापूर येथील युवा शेतकरी निशा संपत ज्ञानेश्वर शिंदे यां दांम्पत्याने देखील बारटोक जातीचे खास भरीतासाठी असलेल्या वांग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन प्रगतीची किमया साधली आहे.
उदापुर येथील शेतकरी संपत शिंदे व त्यांची अर्धांगिनी निशा शिंदे या नवरा बायकोने एकमेकांच्या साथीने ५० गुंठे शेतीमध्ये साडे चार फुटांवर बेड पद्धत करून ठिबक सिंचन केले व चार हजार रोपांची अडी- च फुटांवर लागवड केली आपण केलेल्या शेतातील रोपांना तळ हातातील फोडाप्रमाणे जपत वेळोवेळी खत,औषधांची फवारणी करून जवळपास एक लाख वीस हजार रुपये खर्च केला आहे.
सतत वाढणारी मजुरी व बदलणारे हवामान यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असल्यामुळे तसेच कमी भांडवल असल्यामुळे या नवरा बायकोनेच स्वतः वावरात कष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि मजुरीला फाटा दिला प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर त्याचे चीज नक्कीच होते याची अनुभूती त्यांना आली सध्या वांग्याच्या झाडाला भरपूर फळधारणा झाल्यामुळे उत्पन्न देखील चांगले निघत आहे हे वांगे बारटोक जातीचे भरीताचे वांगी म्हणून प्रसिद्ध असून जांभळा काळसर कलर उभ्या लांब आकाराचे फळे आहेत याचे वजन देखील चांगले भरत आहे.
सध्या या पिकाला १८ ते २० रुपये प्रति किलो बाजार भाव मिळत असून मागणीप्रमाणे काही माल मॉलला देत आहे तर काही माल ओतूर मार्केट या ठिकाणी पाठवत आहे असेच बाजार भाव टिकून राहिले तर जवळपास सात ते आठ लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शिंदे दांपत्याने व्यक्त केली आहे.याभरिताच्या वांगी उत्पादनातून साधली आर्थिक प्रगती उदापूर येथील शेतकरी निशा व संपत शिंदे दाम्पत्याचे यश; आतापर्यंत आठ टन विक्री केली आहे –:अशी केली लागवड:—:-शैतात साडेचार फुटाचे बेड तयार करून त्यावर ठिबक सिंचन लावले:-बेडवर अडीच फुटाच्या अंतरावर लागवड:- पाणी व खतांच्या नियोजनबद्ध मात्रेसह औषध फवारणी:- कैचीचा बांबू, तारा व कारल्याचा बाग उभा करून वांग्याच्या रोपांना आधारपत्रास गुंठे वांग्याच्या पिकासाठी अंदाजे खर्च शेती मशागत १२ हजार, नवीन ठिबक सिंचन ५० हजार, रोपे २२५००, आधारासाठी बांबू बाग व तारा उभारणी नवीन ६० हजार रूपये, खते व औषधे दोन लाख, एकूण मजुरी एक लाख रुपये असा एकूण अंदाजे साडेचार ते पाच लाखापर्यंत खर्च येतो. तसेच वातावरणाने साथ दिली तर अंदाजे ५० ते ६० टन वांग्याचे उत्पादन निघू शकते. त्याता सरासरी १८ किलोठा भाव मिळाला तरी नऊ ते दहा लाख रूपये मिळू शकतात. -::संपत शिंदे, वांगी उत्पादक शेतकरी–:: :–साडेआठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित– अवकाळी पावसामुळे फवारणीखर्च वाढला असून,उत्पादनात ही पंधरा ते यांस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. पुढील काळात अजून ४५ ते ५० टन वांग्याचे उत्पादन निघेल, अशी त्यांना आशा असून, याच पद्धतीचा बाजारभाव मिळाल्यास आठ ते साडेआठ लाखा रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे, त्या शिदि यांच्याकडे ठिक्क सिंचन संच आणि आधारासाठी बागेला लागणार साहित्य आधीच्या पिकाचे उपलब्ध होते.