प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
समृद्धी ऑरगॅनिक फार्म इंडिया प्रा.लि.पुणे यांच्यावतीने खैरेवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सेंद्रिय शेती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा तज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मस्के यांनी सेंद्रिय शेती करण्यामागील उद्दिष्टे व महत्त्व शेतकऱ्यांसमोर विषद केले. सध्याची हवामानाची बदलती परिस्थिती तसेच रब्बी पिकांची एकूण स्थिती बघता हवामानानुसार शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याविषयी सखोल मार्गदर्शन केले याबरोबरच मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा व जमिनीचा विचार करूनच पीक निवड,सेंद्रिय खतांचा वापर,जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे विविध पैलूंवर भर देऊन शेतकऱ्यांना शेती सेंद्रिय शेतीशी संबंधित उपलब्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आवाहन करण्यात आले याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खते व औषध तयार करण्याची पद्धती विषद करण्यात आली व NPOP प्रमाणिकरण व त्याची मानके उपस्थित शेतकऱ्यांना समजावण्यात आली. तसेच शेतीतील काडी कचरा व पिकाचे अवशेष कुजवण्यासाठी उपयुक्त अशी इतके बायो कंपोजर कल्चरचे मोफत वाटप करण्यात आले सदर कार्यशाळेमध्ये ४२ शेतकऱ्यांची उपस्थिती होती.