जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
प्रथमच महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गमध्ये आदिवासी कोपरे गावात बहरली असून सध्या ती मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे.कोपरे येथील काठेवाडी गावा- तील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी शेतकरी रमेश भिवा बांगर त्यांच्या आई यमुना भिवा बांगर वडील भिवा रामा बांगर यांच्या काठेवाडी या ठिकाणीं १० गुंठे शेतात ५००० स्ट्रॉबेरीची रोपांची लागवड करण्यात आली असून सध्या स्ट्रॉबेरीची फळे विक्रीस उपलब्ध झाली आहे.
जुन्नर तालुक्यातील कोपरे,मांडवे,मुथाळणे, जांभूळशी,ही गावे आदिवासी दुर्गम भागात येतात,येथे पावसाळ्यात खूप जास्त पावसाचे प्रमाण असते तर उन्हाळ्यामध्ये याच्याविरुद्ध परिस्थितीत असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो या भागातील शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेतीची उदा.भात ,नाचणी,सावा,वरई,खुरासनी, हि पिके घेतात.या भागातील शेतजमीनी या कोरडवाहू असून पावसाळ्या त पडलेले पाणी हे कुंडात साठवून त्यावरतीच कशीबशी पीक घेतात या भागातील लालमाती व महाबळेश्वर येथील लालमाती ही एक सारखीच असल्याने बांगर कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना अचंबित करणारा निर्णय घेऊन स्ट्रॉबेरीची लागवड केली.
या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यात रमेश बांगर यांचे मामा दादाभाऊ हगवणे यांच्या आर्थिक सहाय्य व मदतीने महाबळेश्वर येथून ५००० रोपांची स्ट्रॉबेरी खरेदी करून २०। सप्टेंबर२०२३ रोजी काठेवाडी (कोपरे) येथे लागवड केली.संपूर्णस्ट्रॉबेरीला सेंद्रिय खताचा वापर करून यशस्वी स्ट्रॉबेरी पिकांचे उत्पादन घेतले आहे.आता स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे त्यांचे पंचक्रोशीतील शेतकरी उदापूर,ओतूर,मांदारणे,डिंगोरे, बनकरफाटा, यागावातून शेतकरी तसेच संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून त्यांचें अभिनंदन होत आहे. तरी त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमातून या गावांतील आदिवासी बेरोजगार युवक येथून पुढे प्रेरणा घेऊन स्ट्रॉबेरी पिकासह आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी नगदी पिके घेतील. या आदिवासी भागामध्ये मांडवी नदीवर शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी एमआय टॅंक झाला तर या भागातील शेतकरी हा नक्कीच सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास गावातील स्थानिक शेतकरी तुकाराम काठे,युवराज माळी,किसन बांगर, लक्ष्मण कुडळ,सुनील कवटे यांनी दैनिक पुण्यनगरी सोबत बोलताना व्यक्त केला .