जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

रविवार दि:-१३ ऑगस्ट रोजी अभिषेक रावलकर वय वर्षे २९ माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याचा आनंद उपभोगत असताना काळू नदीवरील धबधब्याच्या खालच्या भागात पाय सटकून हा पर्यटक पडला होता.डोह खोल असल्यामुळे व पाण्याचा जोर पाहता त्यात तो अदृश्य झाल्यामुळे तो जिवंत असण्याची शक्यता मावळली होती. तेव्हापासून सहा दिवस रेस्क्यू टीमचे शोध कार्य चालू होते.दीपक विशे कमळू पोकळा व त्यांचे सहकारी,कुसुम विशे,भास्कर मेंगाड शंकर साबळे, प्रशांत घरत,विजय कालेकर स्वामी,विनोद,जगदीश ताजवे थितबी आणि वाघेवाडीतील ग्रामस्थ,पोलिस प्रशासन सतत शोध घेत होते.

काळूचा वरपासून ते तळापर्यंत पर्यंत पाणी कमी असताना रॅपलिंग केल्याचा आम्हाला अनुभव असल्यामुळे काम करण सोपं जात होत.पण तो पर्यटक डोहात आहे कि पाण्याच्या प्रवहाबरोबर खाली वाहत गेला कि काय हे कळायला मार्ग नव्हता.अखेर ड्रोन च्या साह्याने डोहापुढील पाच किलोमीटर चा टप्पा सर्च केला त्यात कुठेही संशयस्पद आढळून आले नाही.त्यामुळे तेथील डोहात तो पर्यंटक असावा हा अंदाज लावून सर्च करायला सुरवात केली.तिन चार दिवसांनी तेथे थोडी दुर्गधी यायला लागली व खात्री पटली कि बॉडी येथेच असावी. सतत पडणारा पाऊस, धुके, काम करायला अडथळा निर्माण करत होते.जर डोहाच्या तळात जायची गरज पडली रायगड टीमला दीपक विशे यांनी त्यांना येण्याची विनंती केली व ते घटनास्थळी पोहचले .यात सानप यांचे योगदान फार मोलाचं आहे.

या मोहिमेत आम्ही दीपक विशे यांच्या मार्फत सुनील गायकवाड,ओंकार ओक व यातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत सतत घेत होतो.अधिक मदत लागली तर जुन्नरच्या रेस्कु टीमच्याही संपर्कामध्ये होते.स्थानिक पातळीवर वैशाखरे अनिल घरत व प्रशांत हे बंधू स्वतः मदतीला होते.वाघेवाडी व थितबी तील ग्रामस्थ आपली सहकार्य करत होते.अखेर सहाव्या दिवशी प्रयत्नांना यश आले.डोहाच्या आत मोठी कपार आहे त्यात मृतदेह असल्याचे आढळून आला तो मूळ पाण्याच्या प्रवाहात आणून तो बाहेर आणला गेला, यात रायगड रेस्कु टीम च्या सानप यांचा फार मोलाची मदत झाली. तसेच यात प्रशांत घरत याच्या ड्रोन मुळे काम करण सोपं झाले

पर्यटकांच्या एका चुकीमुळे त्याच्या कुटुंबाला किती मनस्ताप भोगावा लागतो. यात किती यंत्रनांना काम करावं लागत पुन्हा या रेस्क्यूत कुणावर काय संकट येईल हेही सांगू शकत नाही.निसर्गावर मात करण्याच्या नादात जीव धोक्यात घालून इतरांना मनस्ताप देण्यात कसले शहणपण त्यामुळे धोकेदायक ठिकाणी जाऊ नका.कुठे गेलात तर तेथील भौगोलिक ज्ञान असणारा स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा आणि त्याने सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा म्हणजे असे प्रसंग कमी होतील.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button