जुन्नर प्रतिनिधी : – रविंद्र भोर
फोफसंडी हे बाराशे लोकवस्तीचे गाव प्राचीन व ऐतिहासिक आहे.१९२५ च्या काळात असे सांगितले जाते की इंग्रजी राजवट असल्याने चर्च मधील पुजारी म्हणजे पोप आपली सुट्टी घालविण्यासाठी या निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या आदिवासी गावात रविवारी म्हणजे इंग्रजी वार संडेला येऊन रहात असे आजही येथे गावात या पोप साठी बांधलेल्या कोठीच्या भिंती दिमाखात उभ्या आहेत त्यामुळे पोपसंडे असे गावाचे नाव रूढ झाले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असे झाले. तर या संदर्भात दुसरी माहिती अशी आहे की संगमनेरचा प्रांताधिकारी फोफ हे घोडेस्वार होऊन येथे निसर्गरम्य ठिकाण म्हणून येत होते.त्यांच्या नावाहून फोफसंडी असे नाव पडले.चार जिल्ह्यांची सिमारेषा या गावाला लागते.पूर्वी येथील आदिवासी बांधव डोंगरात मोठ्या गुहा,गडदि म्हणजे कपारीत आपल्या कुटुंब कबिल्या- रहात होते आजही येथे तीस ते चाळीस मोठ्या गडद असून १५० जनावरांचा गोठा हा गुहेत असून तीन कुटुंब तेथे राहतात.केवळ शासनाच्या सुविधा नाहीत म्हणून तेथील कोंबड किल्ला (कुंजीर गड) हे महत्वाचे आकर्षण असून मांडव्य ऋषी यांचे साधना व तपचर्या चे स्थान जेथून मांडवी नदीचा उगम होतो येथे सकाळी ०९ वाजता सुर्य उगवतो आणि साडेचार वाजता मावळतो.लव्हासा सिटी पेक्षाही सुंदर असे हे फोफसंडी गाव असून १९९७ सालापासून समाजसेवक दत्तात्रय मुठे,सरपंच सुरेश वळे,उपसरपंच संजय घोडे शांताराम वळे तसेच यशवंत घोडे,ज्ञानदेव वळे, ज्ञानेश्वर वळे,भगवान घोडे,मंगेश कोंढार या शिक्षकांसह नोकरदार वर्ग हे तेथील गावचा विकास आणि तेथील पर्यटन स्थळ यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत.दुर्दैवाने आज देखील हे गाव मुलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे.मात्र तेथील निसर्ग म्हणजे मिनि जम्मू कश्मिर असल्यामुळे पर्यटक मोठ्या संखेने तेथे जाणे पसंत करतात.