(जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास मंजुरी पर्यटनाला मिळणार चालना : शिरूर महाराष्ट्र न्यूज” ‘ने मांडली सातत्याने जुन्नरकरांची भूमिका)

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पासराज्य मंत्रिमंडळाने सोमवारी दि:- ५ मुंबईतील आयोजित बैठकीत मंजुरी दिली. जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या पर्यटनवाढीसाठी उपयोगी असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरू करण्यासाठी आग्रही होते.त्या दृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरू होता. मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे.

जुन्नरचे स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील सफारी चा व पर्यटन वाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेस अधिन राहून देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या ८०४३.२३ लाख रुपये खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मौजे आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा,तसेच प्रकल्पआराखडा मांडणी अहवालास मान्यता देण्यात आली आहे

:-असा असणार बिबट सफारी प्रकल्प:- या बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून सदर प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले असणार आहे.सफारीमध्ये २.६ कि.मी लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे.हा रस्ता बिबट, वन्यप्राण्यासाठी तयार केलेले पाणवठे, तसेच त्यांच्या अधिवासाजगळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्यप्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.सफारीमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी २० ते २५ आसनक्षमता असलेल्या सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी करण्यात येणार आहेत, या बस सफारी मार्गावरुन विहित वेळेत पर्यटकांसहमार्गक्रमण करतील.हा वेगळा अनुभव असणार आहे-:बिबट सफारीमुळे जुन्नर तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर:-अतुल बेनकेजुन्नर बिबट सफारी प्रकल्पास मंजुरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यावद्दल महायुती सरकारचे आभार व्यक्त करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही मी आभार मानतो.

बिबट सफारीला मंजुरी म्हणजे जुन्नर तालुक्यातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने हे विकासात्मक वआर्थिकदृष्ट्या पहिले पाऊल आहे.बिबट सफारी होण्यासाठी सात्वत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.नुकत्याच वा महिन्यात जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना अजित पवार यांनी विबट सफारी मंजुरीचे संकेतदिले होते,बिबट सफारीमुळे जुन्नर तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे.सफारीमुळे पर्यटकांचे लक्ष जुन्नर तालुक्याकडे वेधले जाणार आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने तालुक्यातील सफारी हा एक ऐतिहासिक प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात याची नोंद होईल. बिबट सफारीमुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होऊन आंबेगव्हाण य त्या लगत असलेल्या अनेक गावांमध्ये बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अनेक व्यवसाय निर्माण होऊन आर्थिक विकासाची प्रगती होणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी ‘शिरूर महाराष्ट्र न्यूजशी” बोलताना सांगितले, “” जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे राज्य शासनाचा पायलट प्रोजेक्ट नियोजित बिबट सफारी प्रकल्प लवकर होणार आहे.त्यास शासनाने आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली असून त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील आंबेगव्हाण परिसराचा कायापालट होऊन मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. या सफारीमुळे आवेगव्हाणसह शेजारील आमच्या रोहोकडी आंबेगव्हाणला देखील याचा मोठा फायदा होणार असून जुन्नर तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व मंत्रिमंडव्यचे मी आभार मानतो.”” (सुभाष नाथा घोलप, सरपंच ग्रामपंचायत, रोहोकड़ी) “बहुचर्चित बिबट सफारी अखेर आंबेगव्हाण या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मिळून स्थिर झाला याचा मनस्वी आनंद आहे. आंबेगव्हाण व आजूबाजूचा परिसर नक्कीच या प्रकल्पाने अधिक प्रगतिपथावर आल्याशिवाय राहणार नाही. शासनाला आंबेगव्हाणचे हित जपून वेळोवेळी सहकार्य केले जाईल. त्याचप्रमाणे या तालुक्यात लोकांवर होणारे बिबट्याचे प्राणघातक हल्ले थांबतील व लोकांचे जीव याचतील व पर्यटन झालेल्या या तालुक्यात माझ्या गावात होणारी बिबट सफारी ही एक अभिमानाची गोष्ट राहणार आहे.””(वाय. जी. गायकर, ग्रामस्थ आंबेगव्हाण,पाचघर) “”राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे ही बिबट सफारी सुरू होणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली असून ती लवकरात लवकर सुरू करावी, यातून पर्यटनाला चालना तर मिळेलच, परंतु आदिवासी भागातील आंबेगव्हाण परिसर व आजूबाजूच्या परिसराचा कायापालट होणार आहे. या बिबट सफारीमुळे स्थानिकांना व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून द्याव्यात हीच अपेक्षा.””(भगवान नाथा घोलप, माजी सरपंच रोहोकडी)

“”जुन्नर तालुक्यातील नागरिक, पर्यटकांचा हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत होती. एकंदरीत हा प्रकल्प आवेगव्हाण या ठिकाणी निश्चित झाल्याने आणि आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने व त्या प्रकल्प कामाला गती येत असल्याने जुन्नर तालुक्यातील आणे माळशेज पट्टचातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापुर, मढ़, डिगोरे, डुंबरवाडी, खामुंडी व उवरित ५० आजूबाजूच्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.( दत्तात्रय गवांदे, माजी उपसरपंच, आंबेगव्हाण) “”आमच्या गावाला ही जी काही बिबट सफारीची मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मिळाली त्याबद्दल मी गावाचा उपसरपंच या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानतो.इथे होत असलेल्या बिबट सफारीमुळे आमच्या आदिवासी दुर्गम भागाचा कायापालट होणार असून आंबेगव्हाणसह आजूबाजूच्या परिसराचा देखील विकास होणार आहे. यासाठी पाठपुरावा करणारे आमदार अतुल बेनके व बिबट सफारीचे जनक माजी आमदार शरद सोनवणे यांचे आम्ही आंबेगव्हाण ग्रामस्थ आभार मानतो.”” (राजेंद्र गायकर, उपसरपंच, आंबेगव्हाण. “”आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथे होत असलेल्या महत्त्वाकांक्षी चिबट सफारी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यासह ओतूर,रोहोकडी,आंबेगव्हाण,लागाचा घाट यासह शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाहा,यासह आदी गावांचा विकास होऊन परिसराचा कायापालट होणार आहे.यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन दळणवळणाच्या दृष्टीने या भागाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.””(प्रकाश सुधाकर हिंगणे, ग्रामस्थ,आंबेगव्हाण, लागाचा घाट.) “”बिबट सफारीच्या प्रकल्पासाठी दीर्घ प्रयत्नाला यश आले असून सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांचे है एकत्रित यश आहे, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. जनभावनेलाही यश प्राप्त झाले असून जुन्नर तालुक्यातील पर्यटनाला निश्चित मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.””(अमोल सातपुते, जुन्नर उपवनसंरक्षक):-लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करणार:- शरद सोनवणे.

जुन्नर प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता देऊन हिरवा कंदील दाखविलेला आहे. बहुप्रतीक्षेत असलेल्या या बिबट सफारी प्रकल्पाकरिता तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे करीत जनतेने लक्ष वेधले होते. यावेळी “शिरूर महाराष्ट्र न्यूज ने’ वेळोवेळी आंदोलकांची बाजू लावून धरली होती.जुन्नर वनविभागाने देखील या प्रकल्पासाठी जनभावनेचा आदर केला होता.१ फेब्रु व रोजी मी मुख्यमंत्री,सचिव,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव विकास खारगे यांना भेटून सांगितले की, एक प्रस्ताव दिल्लीला आहे, जर महाराष्ट्र सरकारने आपल्या हाय पावर कमिटीकडून मंजूर केला तर उ‌द्घाटन करता येणार आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने कॅबिनेटला प्रस्ताव ठेवून अखेरची मान्यता दिली आहे. किंबहुना शाश्वत काम करायला अनुमती दिलेली आहे.आता लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उ‌द्घाटन करणार आहोत,अशी माहिती माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिली.

“”शिवभक्त शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि बारामतीला गेलेली बिबट सफारी पुन्हा जुन्नरला खेचून आणली या निमित्ताने आंबेगव्हाण ग्रामस्थांनी पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा!!या प्रसंगी धनंजय डुंबरे विघ्नहर कारखान संचालक, विकास भाऊ राऊत सरपंच, अनिता ताई डोके, पप्पू हिंगणे, राजेंद्र गायकर, वैभव हिंगणे, संजय मुरादे, मच्छिंद्र गाढवे, गणेश गायकर, शुभम लंबे, ज्ञानेश्वर कडाळे, निवृत्ती दराडे, प्रवीण लंबे, संजय केदारी, अशोक डोके, नामदेव डोके, संदीप केदार, विलास मेंगाळ, निलेश मुरादे, मनीषा गायकर, अनिता कडाळे, सुनिता कडाळे व समस्त ग्रामस्थ आंबेगव्हाण उपस्थित होते”

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button