जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
दिनांक १९/०८/२०२३ रोजी ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन कांडगे यांच्या आदेशाने पो. हवा.नरेंद्र गोराणे ब.नं. २०६५, पो.ना. देविदास खेडकर ब.नं. २५९२, पो. कॉ.मनोजकुमार राठोड ब.नं. १११७ व पोलीस मित्र रवि मातेले असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना,मौजे ओतूर ता. जुन्नर जि. पुणे गावच्या हद्दीत अहमदनगर कल्याण हायवेवर मोनिका चौक या ठिकाणी आरोपी नामे शाकीर कमरूद्दीन शेख वय – ४९ वर्षे रा.संमनेर खु|| चर्चच्या समोर ता.संगमनेर जि.अहमदनगर हा त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी नं.एम.एच.१४ के. ए.९५५२ ही घेवुन अहमदनगर बाजुकडुन कल्याण बाजुकडे जात होता.
सदरच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने पिकअप गाडीमध्ये गोण्यांमध्ये भुसा असल्याचे सांगीतले.त्यानंतर पिकअप गाडीची पाहणी केली असता फाळक्याच्या आतील बाजुस भुशाने भरलेल्या गोण्या दिसुन आला.परंतु गोण्यांच्या आतील बाजुस एक चौकोणी जागा करून त्यामध्ये बेकायदेशिर रित्या कत्तल केलेल्या जनावरांचे मुंडके,अर्धवट तुटलेले पाय, कलेजी व इतर अवयव असे अंदाजे ३,००० किलो वजनाचे गोमांस मिळुन आले आहे. सदरच्या आरोपीच्या ताब्यातुन १ ) ६,००,००० /- रू किंमतीचे अंदाजे ३,००० किलो वजनाचे गोमांस२)३,००,०००/- पिकअप गाडी नं.एम.एच.१४ के.ए.९५५२असा एकुण ९,००,००० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी शाकीर कमरूद्दीन शेख वय – ४९ वर्षे रा. संमनेर खु। चर्चच्या समोर ता.संगमनेर जि:- अहमदनगर याच्या विरूध्द दिनांक १९/०८/२०२३ रोजी १०:२४ वा. गु.र.नं. ४२५/२०२३ गोवंश हत्या (सुरक्षा) महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ चे कलम ५(C),९(A),९(B) प्रमाणे ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.अंकीत गोयल,पोलीस अधीक्षक साो.पुणे ग्रामीण, मा.मितेश घट्टे अप्पर पोलीस अधीक्षक सो.पुणे ग्रामीण,मा.रविंद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सो.जुन्नर विभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री.सचिन कांडगे,पो.हवा. नरेंद्र गोराणे,पो.हवा.बाळशिराम भवारी,पो.हवा.महेश पटारे,पो.ना.देविदास खेडकर,पो.कॉ.मनोजकुमार राठोड,पो.कॉ.ज्योतीराम पवार व पोलीस मित्र रवि मातेले यांनी केली आहे.