जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील घरफोडी, मंदिरांची दानपेटी इतर चोरी करणा-या अट्टल चोरांस आळेफाटा पोलिसांनी अटक केले.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार नळावणे ता.जुन्नर येथील प्रसिध्द असलेले खंडोबा मंदिर तसेच त्या शेजारी असलेले रामेश्वर व जेजुरी लिंग मंदिरामध्ये दि.१९ जुलै रोजी रात्री ८ ते १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खंडोबा मंदिराचा गेट तोडुन चोरीचा प्रयत्न केला तसेच
पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील घरफोडी,मंदिरांची दानपेटी इतर चोरी करणा-या अट्टल चोरांस आळेफाटा पोलिसांनी अटक केली.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार नळवणे ता.जुन्नर येथील प्रसिध्द असलेले खंडोबा मंदिर तसेच रामेश्वर मंदिरातील दानपेटी व लिंग मंदिरातील घंटा चोरून नेला होता याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरीच्या गुन्ह्याचे गांर्भिय लक्षात घेऊन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी तपासासाठी विशेष पथक बनवुन तपास सुरू केला असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सचिन गंगाधर जाधव रा.औंरागाबाद यास संशयित आरोपी म्हणुन ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा किरण सुनिल दुधवडे साकुर रा.अकलापुर जि.अहमदनगर, सुरेश पंढरीनाथ पथवे व सुनिल उमा पथवे हे दोघेजण रा.आवारी धामणगाव जि.अहमदनगर व नवनाथ विजय पवार रा.साकुर मांडवे ता.संगमनेर यांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली.तसेच या आरोपींकडे कसुन तपास केला असता आरोपींणी संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र अकलापुर येथील दत्त मंदिरातही चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला आहे.गुन्ह्यात आरोपींकडुन मंदिर चोरीतील घंटा, स्पिकर सेट, समई, आरतीचे ताट तसेच पिंपळवंडी येथील अंगणवाडी चोरीतील टिव्ही युनिट, गॅस टाकी, शेगडी गुन्ह्यात वापरलेली २ मोटार सायकल, बोलेरो गाडी असा एकुण १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर,पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर,अनिल पवार, एस.कांबळे,चंद्रशेखर डुंबरे, टाव्हरे, विनोद गायकवाड,पारखे, पोळ,अमित माळुंजे,नविन अरगडे,हनुमंत ढोबळे,लोहाटे, प्रशांत तांगडकर,आमले,सचिन पानसरे यांनी केली.