१९ सुवर्ण,१५ रौप्य व ९ कांस्यपदके पटकावत २९० विद्यार्थ्यांचा सहभाग.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सी बी एस ई मान्यता प्राप्त इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलीब्रेशन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविल्याची माहिती प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.रंगभरण स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,ग्रीटिंग कार्ड स्पर्धा,कॉलोज मेकिंग स्पर्धा,स्केचिंग स्पर्धा,फोटोग्राफी स्पर्धा,फिंगर प्रिंटिंग स्पर्धा या विविध कला स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुलच्या एकूण २९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत विविध पदके पटकावल्याची माहिती एच पी नरसुडे यांनी दिली. इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या समृद्धी शेळके हिने ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.या विद्यार्थिनीला राष्ट्रीय रोप्य पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तेजस्विनी आहेर या इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनीने कोलाज मेकिंग स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.प्रिया राजदेव या इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनीने स्केचिंग स्पर्धेत आर्ट मेरिट पुरस्कार पटकावला.तसेच श्रीनिका शेळके या इयत्ता ४थी मधील विद्यार्थिनीने रंगभरण स्पर्धेमध्ये आर्ट मेरिट पुरस्कार मिळवला.राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये एकूण १९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रशस्ती- पत्रक,१५ विद्यार्थ्यांना रौप्यपदक व प्रशस्तिपत्रक तसेच ९ विद्यार्थ्यांना कांस्यपदक व प्रशस्तीपत्रक आणि ४ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.पारितोषिक मिळवलेल्या व सहभागी झालेल्या -:विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:-तेजस्विनी आहेर,प्रिया राजदेव,श्रीनीका शेळके,अनन्या गुंजाळ,आदिती सरोदे,कार्तिकी किथे,काव्या गुंजाळ,संस्कृती देशमाने,शिवम गांधी,पवित्रा कडाळे,जिजा औटी,विश्वम आहेर मल्हार नाईकोडी,सोहम लेंडे,गौरी चौधरी,प्रांजल दाते,सोहम शिरोळे,आराध्या हाडवळे,जुई कोरडे,प्रभास बांगर, तेजस्विनी आहेर,रुद्र भांबेरे,रीदा आतार,संस्कार देशमाने,सोहम शिंदे,मुग्धा हाडवळे,शौर्य झावरे,सार्थक गोफणे,सानवी दाते,जय खुटाळ,शरण्या गलांडे,जानवी वाडेकर,सई मेहेर,श्रावणी चौधरी,स्पंदिनी धुमाळ,आराध्या साळुंखे,श्रावणी गुंजाळ,आर्यन कितनी,ईश्वरी मेहेर,लावण्या गुंजाळ,आर्या गोरडे,श्लोक दाते,शिवार्थ शेळके,प्रणव कोरडे,श्रीविष्णू कार्तिकी,संस्कृती देशमाने,पारस मोरे,ऋतु मटाले,सरी आहेर सदर विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,संचालिका सारिका ताई शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button