जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मंगळवार दि:-०३ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे वाड्मय मंडळ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी उत्तम सदाकाळ ( प्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते )यांचे “आदर्श समाज निर्मितीमधील साहित्य क्षेत्राचे योगदान”या विषयावर व्याख्यान आयोजीत केले होते. याप्रसंगी उत्तम सदाकाळ यांनी विद्यार्थ्यांना अगदी रंजक पद्धतीने विविध उदाहरणे,दाखले देवून,तसेच त्यांच्या विनोदी कथा,कवित सांगून व्याख्यानाच्या विषयाची खोली अत्यंत सहसजतेने विद्यार्थ्यांना समजावून सांगितली व विद्यार्थ्यांना साहित्यनिर्मितीचे महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी जु.ता.शि.शि.प्र.मंडळ संस्थेचे सहसचिव कवडे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्हि.बी. कुलकर्णी तसेच संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एम.बी वाघमारे,कनिष्ठ महाविद्यालया च्या उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस.ए. श्रीमंते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाड्.मय मंडळाचे प्रमुख प्रा.जी.एम. रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.व्ही.एच.सावंत तर आभार प्रदर्शन प्रा.एन.एम.धर्माधिकारी यांनी केले.