शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
संघर्षातूनच जीवनाची खरी सुरुवात होत असल्याचे प्रतिपादन tv9 च्या वृत्त निवेदिका निकिता पाटील यांनी बाजीराव मस्तानी आंरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने उद्घाटनपर भाषणात केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान घोडेकर हे होते कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सविताताई बगाटे,खजिनदार सोपान जाधव,सरपंच सचिन वाबळे,पालेकर साहेब,आत्माराम पिंगळे उपस्थित होते, पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या कि जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुमची परिस्थिती कधीच आडवी येत नाही माझे आई-वडील हे अल्पशिक्षित असून सुद्धा मी आज एका प्रथितयश वृत्तवाहिनी मध्ये नृत्यनिवेदिका म्हणून काम करत आहे, विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिश्रम घेऊन यश संपादन करणे गरजेचे आहे वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक चारुदत्त माळी शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज द्वितीय क्रमांक मिथुन माने लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा तर तृतीय क्रमांकाचे तसेच बाजीराव मस्तानी या विषयावर बोलणारा उत्कृष्ट वक्ता चे पारितोषिक अंकिता साकोरे श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ या विद्यार्थिनींनी मिळवले. वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगरचे विद्यार्थी आकाश मोहिते व महेश उशीर द्वितीय क्रमांक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगरच्या तेजस्वी गोंड व अक्षदा कोळेकर यांनी तर तृतीय क्रमांक शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजचे चारुदत्त माळी व संकेत पाटील यांनी मिळवला तसेच सर्वोत्कृष्ट स्पर्धकाचे पारितोषिक एस एन जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचा विद्यार्थी भास्कर शितोळे यांनी मिळवले, श्री पद्ममणी जैन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर
यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बाजीराव मस्तानी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेसाठी दिवसेंदिवस भरघोस प्रतिसाद मिळत आहे वक्तृत्व ही एक कला असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्वाला अतिशय महत्त्वाचे स्थान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले स्पर्धेचे महत्त्वाचे कार्य डॉ.सहदेव चव्हाण,डॉ.राजेंद्र खंदारे,प्रा,अशोक गायकवाड डा घोडके प्रा.मनोहर मोहरे,आकाश पाटील यांनी पूर्ण केले लोकसहभागातून होत असलेल्या या स्पर्धेसाठी अमलोकचंद गांधी अक्षदा शिंदे पाटील,योगेश प्रकाश चौधरी, वैशाली देठे,राजेंद्र घाडगे,पांडुरंग कंद, रमेशचंद्र गांधी,सावळेराम नाईक,योगेश मोरे, जयेश राऊत आदी मान्यवरांनी रोख व करंडक स्वरूपातील बक्षीस दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भवारी प्रास्ताविक शिल्पा शेटे तर आभार हनुमंत शिंदे यांनी मानले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.