जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- उदापूर, ता- जुन्नर येथे मातापालकांच्या सहकार्यातून उत्कृष्ट पाककला व विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धाचें शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ३३ मातांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वादिष्ट असे रुचकर नाना विविध प्रकारचे पदार्थ तयार करून आणले होते. यावेळी उदापूरच्या विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी या पदार्थांचा अस्वाद घेत स्वादिष्ट व खमंग रुचकर पदार्थ खाण्याचा मनमुराद आनंद लुटला.
सदर कार्यक्रम हा श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तसेच सरपंच सचिन आंबडेकर,उपसरपंच सौ जयश्रीताई अमूप,ग्रामविकास मंडळ अध्यक्ष बबनदादा कुलवडे, विद्या विकास मंडळ अध्यक्ष प्रभाकर शिंदे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष पराग जगताप,दुष्यंत बनकर तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. हॉटेलमधील पदार्थ स्वादिष्ट व रुचकर नेहमी वाटतात परंतु त्या पदार्थांमुळे आपल्या आरोग्यावर नेहमीच घातक परिणाम होतात त्यामुळे आपल्या आईने,बहिणीने,बायकोने,सुनेने घरात केलेले पदार्थ खाल्ल्याने कुठलेही दुष्परिणाम जाणवत नाही म्हणून घरीच बनवून खाण्याचा सल्ला शिक्षक सत्यवान म्हस्के यांनी दिला.
यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महात्मा फुले पतसंस्था चेअरमन संजय शिंदे, माजी सरपंच अनंथा बुगदे, ग्रामविकास मंडळ उपाध्यक्ष जालिंदर शिंदे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन अमुप,बाळासाहेब शिंदे,वि.का.सोसा चेअरमन संजय बुगदे,अविनाश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुलवडे,बबन शिंदे, मारुती अमूप,माजी सैनिक दत्तात्रय आरोटे,नवनाथ कुलवडे, शशांक शिंदे,माजी सरपंच प्रमिला शिंदे,माजी उपसरपंच डॉ.पुष्पलता शिंदे,यांसह समस्त ग्रामस्थ उदापूर,पालक व महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सत्यवान म्हस्के यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन व पाककृती स्पर्धा मांडणी सौ.उर्मिला चौधरी व सौ.स्मिता डुंबरे यांनी केले आभार मुख्याध्यापक श्रीम.माणिक फापाळे यांनी केले.