▪️प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा आणि सेवा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने व्यक्तीमहत्व विकास आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर बोलताना स्पर्धा परीक्षेस न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि अभ्यासात सातत्य ठेवावे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करत असताना विद्यार्थी दशेमध्ये मुलांनी आपल्या ध्येयावरती फोकस करून वाटचाल करावी. शिस्तीचे पालन करून गुरुजनांचा आदर करावा जीवन एक संघर्ष असून त्याला न डगमगता सामोरे जा यश निश्चित मिळेल. निरोगी व यशस्वी जीवन जगण्यासाठी व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा.बाळकृष्ण डहाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी व सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव बेनके होते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थिंनी रेश्मा शिवाजी गुंजाळ हिने महाराष्ट्रात नववी रँक प्राप्त केली. तिचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच पीएसआय सागर भोसले , डिफेन्स डीआरडीचे सेवक भरत रासकर ,प्राचार्य तुकाराम बेनके, उपप्राचार्य संभाजी कुटे, ,दिलीप वाळके, अंबादास गावडे नवनाथ डुबे, सतीश अवचिते, शरद शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थिनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्ष डुबे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले .