जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
ओतूर येथील ग्रामविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालयातील सन १९८३ मधील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बनकरफाटा येथील मायभूमी रिसॉर्ट येथे नुकताच शनिवार दिनांक १० सप्टेंबर रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला. अशी माहिती या मेळाव्याचे संयोजक साहेबराव तांबोळी यांनी दिली.सुमारे चाळीस वर्षांनंतर इयत्ता दहावी चे हे सर्व माजी विद्यार्थी अर्थात वर्गमित्र,मैत्रिणी एकमेकांना भेटले होते. एकमेकांना भेटून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद किती बोलू किती नको अशी प्रत्येकाच्या मनाची झालेली अवस्था.शालेय जीवनातील विविध आठवणींत रमलेली मने. एका एका आठवणींचा कोलाज तयार करून या सर्व मित्र मैत्रिणींनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला.यावेळी शाळेत शिकवणारे शिक्षक जी.आर डुंबरे सर,सखाराम तांबोळी गुरुजी,सावळेराम आरोटे सर,हांडे मॅडम,निर्मला पानसरे बाई,यांची पाद्यपूजा करून आणि दिवंगत शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर उपस्थित असलेल्या एकमेकांचा परिचय करून घेऊन गत सुवर्ण आठवणींना सर्वांनी उजाळा दिला.मनोरंजनाच्या कार्यक्रमात सर्वानी सहभागी होऊन आपले बालपण अनुभवले. वर्गातील बरेचसे विद्यार्थी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत पण साहेबराव तांबोळी,धनंजय ढमढेरे,नामदेव अमूप,सुभाष शिंदे,शशिकांत शिंदे मछिंद्र कुलवडे, दत्तात्रय कुलवडे,सुभाष भास्कर यांनी या सर्वांना एकत्र आणून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. स्नेहम ळाव्याचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सर्व खेळीमेळीचे वातावरणात एकमेकांना समजून घेत व गप्पांच्या हितगुज करत पूर्ण केले.