प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे दि.६ फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलन व ७ फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावी शुभेच्छा समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार पोपटराव गावडे,मा.सुर्यकांत पलांडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे,भाजपा युवा आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे,एकनाथ शेलार,इ.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यालयात राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती सांगून सतत १० वी १२ वी बोर्ड परिक्षेचे निकाल १०० टक्के लावण्याचे विद्यालयाची परंपरा असून विद्यार्थी केंद्र बिंन्दु माणून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना परिक्षेच्या काळात आरोग्यांची काळजी घेण्याचे आवाहन मा.आमदार सुर्यकांत पलांडे यांनी सांगितले.मा.आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रयत्नांतून शाळेला मान्यता मिळाल्याने विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.जयेश शिंदे यांनी मोबाइलचा कमीत कमी वापर करुन वाचनावर भर द्यावा असा मौलिक सल्ला देत शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यी मनोगतात मुलांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या.स्नेहसंमेलन कार्यक्रमात नृत्य, नाटक,पोवाडे सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संभाजी वि.का..संस्थेचे चेअरमन मनोहर भोसले, राजाराम बेंन्द्रे ,बाळासाहेब बेंन्द्रे,धोंडिभाऊ इंगळे,पालक संघाचे उपाध्यक्ष सागर रासकर,मा.उपसरपंच रामदास वाघचौरे,पांडुरंग वेताळ,बाजीराव रासकर,उपप्राचार्य संभाजी कुटे,ज्युनिअर विभाग प्रमुख संतोष शेळके,शाळा व्यवस्थापक अनिकेत बेनके,सिध्यार्थ गायकवाड, वैभव लाड,सतिश अवचिते,सुप्रिया काळभोर,प्राजक्ता शितोळे ,संतोष हिंगे,दिलिप वाळके,अंबादास गावडे,ज्योती गजरे,शिवानी बेनके,मनिषा दिवटे, रोहिणीधुमाळ,सत्यश्री दिवटे बाबुराव मगर,शरद शेलार, मच्छिंद्र बेनके, लक्ष्मण हरिहर इ.मान्यवरांच्या उपस्थिति मध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रध्यापक संतोष शेळके यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले.