प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा, राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सोहळा नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडला.८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनने विशेष पुरस्कार समारंभाचे आयोजन केले होते.यावर्षीचा राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव पुरस्कार उपक्रमशील आदर्श शिक्षिका स्वाती संदीप क्षीरसागर यांना प्रदान करण्यात आला.सहकार,शिक्षण क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा स्वाती संदीप क्षीरसागर आदर्श उपक्रमशील शिक्षिका यांनी नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बैंक लिमिटेड (घोडनदी) शिरूर जि.पुणे या शाखेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर कामकाज केले तसेच विद्याधाम प्रशाला देवदैठण ता.पारनेर,जि.अहिल्यानगर या ठिकाणी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन तसेच अनेक विद्यार्थी यशस्वी होवून उच्च पदावर कार्यरत आहेत.सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब,ता. भूम जि.धाराशिव येथे उपशिक्षिका पदावर कार्यरत. ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या क्षीरसागर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड.मनीषाताई रोटे,ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक सुजाता पेंडसे,आंतरराष्ट्रीय वक्त्या सुमिता सातारकर,यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉ.साधनाताई पाटील,सुप्रसिद्ध गायिका संज्योती जगदाळे,रायगडच्या सुप्रसिद्ध योगा समुपदेशक विभा चोरगे,सर्स एज्युकेशन अकॅडमीच्या प्रियांका गोरे,भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे अध्यक्षा मनीषा लोहार,एमजेएफ महिला विभागाच्या संचालिका मिनाक्षी कदम उपस्थित होत्या.पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,समग्र शिक्षाचे जिल्हा समन्वयक प्रदीपदादा देवकाते,शहाजीराजे पवार,कुमार रामदास इंगळे,संतोष रामदास इंगळे यांनी क्षीरसागर यांचे विशेष अभिनंदन केले.कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक भास्कर भूषण पब्लिकेशनचे कार्यकारी संपादक राजीव लोहार तर सूत्रसंचालन ॲड.प्राजक्ता लोहार यांनी केले.