प्रतिनिधी :जिजाबाई थिटे
पुस्तक बुक गॅलरी राजगुरुनगर आयोजित कवी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत कवी मोहन काळे (मुबंई ) हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका सौ.मयुरी भवारी यांनी केले होते. कार्यक्रमात पुढे ज्येष्ठ कवी मोहन काळे यांनी आपल्या विविध कवितांचे वाचन आणि सादरीकरण केले.सामाजिक कविता,आईवरच्या कविता, पावसावरच्या कविता,लहान मुलांसाठी कविता तसेच पुस्तकांवरच्या कविता अशा अनेक कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या प्रभावी शैलीने आणि उत्तम सादरीकरणाने राजगुरुनगरचे श्रोते भारावून गेले. तसेच उपस्थित कवींचीही काव्य मैफिल रंगली.अनेक कवींनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या.या कार्यक्रम प्रसंगी कवी डी. के.वडगावकर,डॉ.अमोल वाघमारे, संदीप पाटील,डॉ.निलम गायकवाड, डॉ.गणेश सोनवणे,सौ.रुपाली पाचारणे,दीपक कोबल,अमित शिंदे, केदार बच्चेपाटील,प्रणव टिमुने, क्षितिज भवारी,प्रज्योत कोकणे आणि डॉ.हनुमंत भवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.