प्रतिनिधी :जिजाबाई थिटे
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अधिवेशन १० फेब्रुवारी मुंबई मुलुंड येथे होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पुणे जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रामनाथ इथापे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई मुलुंड येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. पर्यंत होणार आहे या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार आहेत व स्वागताध्यक्ष खासदार संजय दिना पाटील तर या अधिवेशनाचे अध्यक्ष शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष तथा मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर आहेत प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री सुभाष देसाई माजी मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते खासदार संजय राऊत खासदार अनिल देसाई खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते विनायक राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार अनिल परब आमदार सुनील राऊत उपस्थित राहणार आहेत.या अधिवेशनाला एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजेची मंजुरी मिळाली आहे अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रामनाथ इथापे यांनी दिली.
या अधिवेशनातील प्रमुख मागण्या जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, शिक्षण सेवक पद रद्द करा, १५ मार्च जाचक संचमान्यतेचा जीआर रद्द करा, जिल्हा परिषद शाळेचे कंत्राटी धोरण व खाजगीकरण आदेश रद्द करा,विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबतचा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन आदेशानुसार प्रचलित धोरण अमलात आणा, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना (१०-२०-३०) लागू करा, २४ वर्षे झालेल्या शिक्षकांना वेतनश्रेणी सरसकट लागू करा, अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या शिक्षकांना डीएड अनिवार्य बाबत शासन निर्णय रद्द करा, कला क्रीडा व कार्यानुभवासाठी आर. टी. सी. नुसार विशेष शिक्षकाचे पद निर्माण करा, शिक्षकांना मुख्यालयात राहण्याची अट रद्द करावी, कंत्राटी शिक्षक भरती धोरण रद्द करा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस योजना लागू करा,शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावी. शिक्षण विभागातील शिक्षकासह सर्व पदे ताबडतोब भरण्यात यावी. सर्व शाळांना सातव्या वेतन आयोगा अंतर्गत १२% प्रमाणे वेतनत्तर अनुदान द्या. समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्या. रात्र शाळांना विशेष दर्जा द्या. वस्ती शाळा शिक्षकांची मूळ नियुक्तीची तारीख पदोन्नती पेन्शन वरिष्ठ वेतन बदलीसाठी ग्राह्य धरा. शिक्षकाचे अशैक्षणिक कामे बंद करा. आदी मागण्यावर विचार विनिमय होणार असून. या व अन्य इतर मागण्या मान्य करून घेण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी पुणे जिल्ह्यातील हजारो शिक्षकबंधू भगिनींनी या अधिवेशनामध्ये सहभागी व्हावे व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पुणे जिल्हाध्यक्ष रामनाथ इथापे यांनी केले आहे.