शुभम वाकचौरे

विद्यार्थ्यांनी केली आई-वडीलांची पूजा, ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुकशिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील ज्ञानांकुर शिक्षण संस्था संचलित सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्य पूजन करून औक्षण केले व आशीर्वाद घेतले. भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना उच्च स्थान दिलेले आहे. आई-वडिलांप्रती मुलांमध्ये स्नेह, ममत्व, आदर, कर्तव्य वृद्धिंगत व्हावे व एक आदर्श पिढी उदयास यावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानांकुर शिक्षण संस्थेच्या सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक संजय पठाडे उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्काराच्या अभावामुळे समाजातील असंख्य कुटुंबांच्या नात्यांमधील ओलावा कमी होऊन कुटुंबांमध्ये कटूता निर्माण झालेली आहे. आदर्श पिढी घडवायची असेल तर मुले लहान असतानाच त्यांच्या कोवळ्या मनांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे. सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये ज्ञानदानाबरोबरच मुलांमध्ये संस्काराची पेरणी केली जाते याचा आनंद आहे.आपण जे पेरणार तेच उगवणार. मुले निरीक्षणातूनच शिकत असतात. आजच्या मातृ-पितृ पूजन सोहळ्यातून मुलांच्या मनामध्ये आपल्या आई-वडिलांविषयी आदर वाढेल त्याचबरोबर मुलांमध्ये आज्ञा पालनाची बीजे रोवली जातील असा आशावाद मा. उपसरपंच विक्रम निचित यांनी व्यक्त केला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना अरूण निचित यांनी सांगितले की, सुसंस्कारीत पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. सार्थक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी खूप मेहनत घेतली जातेय. यामुळे मुलांच्या भविष्याची चिंता नसल्याचे प्रतिपादन व्यक्त केले.

यावेळी आत्रे काका यांच्या मंत्रोच्चारात मुलांनी विधीवत आई-वडिलांचे पाद्यपूजन केले.तत्पूर्वी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सार्थक प्रायमरी स्कूलचे संचालक संदीप राठोड सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा उपस्थित पालकांना करून दिला. आदर्श विद्यार्थी घडावा यासाठी स्कूलमध्ये सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात याची माहिती दिली.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून पालकांनी स्कूलचे कौतुक करत मुलांच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले. यावेळी किसनराव राऊत सार्वजनिक वाचनालयास संस्थेकडून पुस्तके भेट देण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सानिका राठोड यांनी केले तर आभार अक्षदा निचित यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button